जोफ्रा आर्चरचं शॉर्ट बॉलचं गणित संजू सॅमसनने बिघडवलं, पण ..
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. या सामन्यात चार सामन्यात फेल गेलेला संजू सॅमसन काय कामगिरी करतो, याकडे लक्ष होतं. जोफ्रा आर्चरने प्लानही तसाच केला होता. पण त्याला काही तसं करता आलं नाही.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात आऊट ऑफ फॉर्म फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून होतं. मागच्या चार सामन्यात शॉर्ट बॉलवर संजू सॅमसनला जोफ्रा आर्चरने शिकार केलं होतं. पाचव्या सामन्यातही जोफ्रा आर्चर गोलंदाजीला समोर होता. त्याचा प्लान काय असेल हे सर्वांना माहिती होतं. त्यानुसारच क्षेत्ररक्षण रचलं होतं. प्लाननुसार स्ट्राईकला असलेल्या संजू सॅमसनला पहिलाच चेंडू जोफ्रा आर्चरने शॉर्ट टाकला. पण तयारीत आलेल्या संजू सॅमसनने पहिल्याच चेंडूवर षटकार मारून आपला हेतू स्पष्ट केला. त्यामुळे इंग्लंडला टेन्शन आलं. पण इंग्लंडने प्लान काही बदलला नाही. जोफ्रा आर्चर वेगासह शॉर्ट बॉल टाकत होता. दुसरा चेंडू 143 किमी प्रतितास वेगाने टाकला आणि निर्धाव गेला. तिसरा चेंडूही तितक्याच वेगाने टाकला आणि बोटाला दुखापत झाली. त्यामुळे फिजिओला मैदानात बोलवावं लागलं. त्यानंतरच्या चेंडूवर एलबीडब्ल्यूसाठी अपील झाली. पण चेंडू बाहेर जात असल्याने अपीलचा काहीच उपयोग ठरला नाही.
जोफ्रा आर्चरने पाचवा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट टाकला आणि त्यावर जोरदार प्रहार करत षटकार मारला. त्यानंतर सहावा चेंडूही शॉर्ट टाकला आणि थर्ड मॅनला स्लाईस करत चौकार आला. जोफ्रा आर्चरच्या एका षटकात 16 धावा संजू सॅमसनने ठोकल्या. त्यामुळे संजूचा हेतू काही वेगळाच दिसत असल्याचं जाणवत होतं. इंग्लंडकडून दुसरं षटक टाकण्यासाठी मार्क वूड आला. त्याने पहिला चेंडू निर्धाव टाकला. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्माने प्रत्येकी दोन धावा घेतल्या. चौथ्या चेंडूवर एक धाव घेत संजू सॅमसनला स्ट्राईक दिली.
Sanju Samson dismissals in this T20I series vs England:
5 consecutive short balls, 5 consecutive dismissals in the same way. 💔
Unforgettable series for Sanju Samson! 🥲#SanjuSamson #INDvENG pic.twitter.com/6Q2rRF69tN
— Saabir Zafar (@Saabir_Saabu01) February 2, 2025
संजू सॅमसनसाठी मार्क वूडने पुन्हा एकदा शॉर्ट बॉल प्लान वापरला. या चेंडूवर संजू सॅमसन पुन्हा एकदा चुकला आणि डीप स्क्वेअर लेगला झेल देऊन बाद झाला. संजू सॅमसन अशा पद्धतीने बाद होण्याची ही पाचवी वेळ आहे. या मालिकेत अशाच पद्धतीने पाच वेळा बाद झाला आहे. त्यामुळे त्याची कमकुवत बाजू उघड झाली आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत संजू सॅमसन यावर काय औषध शोधतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.