IND vs ENG 5th Test | मालिकेतील अंतिम सामना कधी? लाईव्ह कुठे पाहता येणार?
India vs England 5th Test Live Streaming | इंडिया-इंग्लंड विरुद्ध यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरच्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत.
धर्मशाला | टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका जिंकलेली आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने चौथा कसोटी सामना जिंकून सीरिज लॉक केली. त्यानंतर आता टीम इंडियाचं लक्ष्य हे विजयी चौकार मारण्याकडे आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने बेझबॉल स्टाईलने खेळणाऱ्या इंग्लंडला त्यांच्याच पद्धतीने धडा शिकवला. आता दोन्ही संघ हे पाचव्या कसोटीसाठी तयार झाले आहेत. हा पाचवा सामना कधी आणि कुठे होणार हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना 7 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना धर्मशाळा येथे आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचव्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचव्या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 9 वाजता टॉस होईल.
पाचव्या सामन्यासाठी टीम इंडियाचा जोरदार सराव
📍 Dharamsala ⛰️
Getting series finale READY 👍 👍#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/bjtFD6y3EK
— BCCI (@BCCI) March 5, 2024
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.