IND vs ENG 5th Test | भारतात येऊन इंग्लंडच्या गोलंदाजाची दादागिरी, दोन खेळाडूंना थेट भिडला
IND vs ENG 5th Test | टीम इंडिया आणि इंग्लंडमधील शेवटच्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडचा एक गोलंदाज दादागिरी करताना दिसला. टीम इंडियाच्या दोन खेळाडूंना त्याने धमकी दिल्याचं पाहायला मिळालं. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.
मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील अखेरचा शेवटचा कसोटी सामना सुरू आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत 200 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी शतक तर देवदत्त पड्डिकल आणि सर्फराज खानने अर्धशतक केलं. इंग्लंडच्या एका गोलंदाजाने टीम इंडियाच्या खेळाडूंची खोड काढली. सर्फराज खान आणि यशस्वी जयस्वाल यांची मजा घेताना दिसला.
कोण आहे तो खेळाडू?
टीम इंडिया आणि इंग्लंडमधील सामन्यामध्ये रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी शतकी खेळी केली. दोघांनीही इंग्लंडच्या गोलंदाजांचा घाम काढला. रोहित 103 धावा आणि शुबमन 110 धावा केल्या आहेत. दोघांच्या शतकी खेळीनंतर देवदत्त पड्डीकल आणि सर्फराज खान यांनी सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेतलीत. पदार्पणवीर देवदत्त पड्डीकलची 65 धावांची तर सर्फराज खान याने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली.
यशस्वी जयस्वाल याला आऊट केल्यावर इंग्लंड संघाच्या बशीर याने त्याच्याकडे रागाने पाहिलं. एकवेळ हे ठीक होतं पण त्यानंतर सर्फराज खान याने मार्क वुड याची धुलाई केलेली पाहायला मिळाली. टी-ब्रेकनंतर बशीर याने सर्फराजला आऊट करत बशीर याने सर्फराजलाही डिवचलं. जीभ बाहेर काढलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. क्रिकेट चाहतेही या कृत्याने त्यावर चांगले संतापले आहेत.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.