IND vs ENG | टीम इंडिया चौथ्या कसोटी सामन्यासाठी रेडी, नेट सेशनमध्ये या खेळाडूंचा जोरदार सराव
IND vs ENG 4th test : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. रांचीमध्ये पोहोचल्यावर खेळाडूंनी बुधवारी जोरदार सराव केला. फोटो सोशल मीडियावर व्हायर झाले आहेत.
Follow us
टीम इंडिया आणि इंग्ल्डंडमधील चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. हा सामना रांचीमध्ये होणार असून टीम इंडिया या सामन्यासाठी तयार आहे. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत.
टीन इंडियाचे खेळाडू रांचीमध्ये दाखल झाले असून सरावालाही सुरूवात केली आहे. आज पार पडलेल्या सराव सत्राचे फोटो बीसीसीआयने शेअर केले आहेत.
टीम इंडियााचे युवा खेळाडू सर्फराज खान, यशस्वी जयस्वाल, रजत पाटीदार यांनी नेट सेशनमध्ये जोरदार सराव करत घाम गाळला. सर्वांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. आता मालिकेमध्ये टीम इंडियाकडे 2-1 ने आघाडी आहे.
चौथ्या सामन्यासाठी टीम इंडिया:- रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (WK), केएस भरत (WK), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.