Ind vs Eng ICC World Cup Highlight : टीम इंडियाचा इंग्लंडवर 100 धावांनी विजय, स्पर्धेतील सलग सहावा विजय

| Updated on: Oct 29, 2023 | 9:34 PM

Ind vs Eng ICC World Cup 2023 Highlight : भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. इंग्लंडला विजयासाठी 230 धावांचं आव्हान दिलं होतं. पण इंग्लंडचा संघ सर्वबाद 129 धावा करू शकला. भारताने इंग्लंडवर 100 धावांनी विजय मिळवला.

Ind vs Eng ICC World Cup Highlight : टीम इंडियाचा इंग्लंडवर 100 धावांनी विजय, स्पर्धेतील सलग सहावा विजय

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताने इंग्लंडचा वचपा काढला. नाणेफेकीचा कौल जिंकत इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फेल ठरला. भारतीय संघाला 229 धावांवर रोखलं खरं पण या धावांचा पाठलाग करणं कठीण झालं. इंग्लंडचा संपूर्ण संघ फक्त 129 धावा करू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने 4, जसप्रीत बुमराहने 3, कुलदीप यादवने 2 आणि रवींद्र जडेजाने एक गडी बाद केला. भारताने इंग्लंडला 100 धावांनी पराभूत केल्याने नेट रनरेटमध्ये जबरदस्त फरक पडला. तसेच 12 गुणांसह असून गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे.

वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ:-

रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 29 Oct 2023 09:22 PM (IST)

    Ind Vs Eng ICC World Cup live score : इंग्लंडची हाराकिरी, भारताचा सलग सहावा विजय

    वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने सलग सहावा विजय मिळवला आहे. इंग्लंडचा 100 धावांनी विजय मिळवला आहे.

  • 29 Oct 2023 09:17 PM (IST)

    Ind Vs Eng ICC World Cup live score : मोहम्मद शमीला चौथं यश, आदिल राशीदला केलं बाद

    आदिल राशीदच्या रुपाने इंग्लंडला नववा धक्का बसला. मोहम्मद शमीने त्याला त्रिफळाचीत करत तंबूचा रस्ता दाखवला.

  • 29 Oct 2023 09:00 PM (IST)

    Ind Vs Eng ICC World Cup live score : इंग्लंडला आठवा धक्का

    कुलदीप यादवला दुसरं यश मिळालं आहे. लियाम लिविंगस्टोनला 27 धावांवर असताना बाद केलं आहे.

  • 29 Oct 2023 08:49 PM (IST)

    Ind Vs Eng ICC World Cup live score : इंग्लंडला सातवा धक्का, ख्रिस वोक्स स्टम्पिंग

    रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन शॉट मारणं ख्रिस वोक्सला महागात पडलं. वोक्स अवघ्या 10 धावा करून तंबूत परतला.

  • 29 Oct 2023 08:29 PM (IST)

    Ind Vs Eng ICC World Cup live score : मोहम्मद शमीला मिळाली तिसरी विकेट, इंग्लंड बॅकफूटवर

    भारताने विजयासाठी दिलेल्या 230 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे 6 गडी स्वस्तात बाद झाले आहेत. त्यामुळे इंग्लंडवर दबाव वाढला आहे. तर शमीच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडची स्थिती एकदम वाईट झाली आहे.

  • 29 Oct 2023 07:56 PM (IST)

    Ind Vs Eng ICC World Cup live score : इंग्लंडला पाचवा धक्का, जोस बटलरला कुलदीपने पाठवलं तंबूत

    इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. कुलदीप यादवने जोस बटरला बाद करत इंग्लंडवर दबाव वाढवला आहे.

  • 29 Oct 2023 07:33 PM (IST)

    अमली पदार्थ विक्री संदर्भात 2 जणांना अटक, आतापर्यंत एकूण 7 जणांना अटक

    चिपळूण : अमली पदार्थ कायद्यांतर्गत पोलिसांनी आतापर्यंत 7 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. चिपळूण तालुक्यात अल्पवयीन मुलांना अमली पदार्थ सेवन करताना स्थानिक नागरिकांनी पकडून दिले. त्यानंतर चिपळूण पोलीस स्टेशन अलर्ट मोडवर आले. या संदर्भात तपास यंत्रणा कामाला लागली असून पाच जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केलीय.

  • 29 Oct 2023 07:25 PM (IST)

    Ind Vs Eng ICC World Cup live score : इंग्लंड संघावर दबाव वाढला, जॉनी बेयस्टो तंबूत परतला

    जसप्रीत बुमराहनंतर मोहम्मद शमीने इंग्लंडला धक्का दिला आहे. जॉनी बेयरस्टोला तंबूत पाठवत इंग्लंडवर दबाव वाढवला आहे.

  • 29 Oct 2023 07:17 PM (IST)

    Ind Vs Eng ICC World Cup live score : जसप्रीत बुमराहनंतर शमीची भेदक गोलंदाजी

    मोहम्मद शमी याने इंग्लंडला तिसरा धक्का दिला आहे. बेन स्टोक्स याचा त्रिफळा उडवला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही.

  • 29 Oct 2023 07:01 PM (IST)

    Ind Vs Eng ICC World Cup live score : जसप्रीत बुमराह याने सलग इंग्लंडला सलग दोन धक्के दिले

    जसप्रीत बुमराह याने इंग्लंडला सलग दोन धक्के दिले. डेविड मलाननंतर आलेल्या जो रूट शून्यावर बाद झाला.

  • 29 Oct 2023 06:56 PM (IST)

    Ind Vs Eng ICC World Cup live score : जसप्रीत बुमराहला पहिलं यश, डेविड मलान बाद

    टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून देण्यात जसप्रीत बुमराहला यश मिळालं आहे. आघाडीला आलेल्या डेविड मलान याला स्वस्तात तंबूत पाठवलं आहे.

  • 29 Oct 2023 05:58 PM (IST)

    Ind Vs Eng ICC World Cup live score : टीम इंडियाचं इंग्लंडसमोर 230 धावांचं आव्हान

    टीम इंडियाने 9 गडी गमवून 229 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर विजयासाठी 230 धावांचं आव्हान दिलं आहे. ही खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी असल्याने या धावा गाठणंही कठीण होईल. आता टीम इंडियाचे गोलंदाज कशी गोलंदाजी करतात याकडे लक्ष लागून आहे. रोहित शर्मा, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव सोडले तर एकही फलंदाजी साजेशी कामगिरी करू शकला नाही.

  • 29 Oct 2023 05:39 PM (IST)

    Ind Vs Eng ICC World Cup live score : सूर्यकुमार यादव 49 धावा करून बाद

    सूर्यकुमार यादव 49 धावा करून तंबूत परतला आहे. त्यामुळे मोठ्या धावसंख्येची अपेक्षा मावळली आहे.

  • 29 Oct 2023 05:15 PM (IST)

    Ind Vs Eng ICC World Cup live score : टीम इंडियाला सातवा धक्का, शमी आला तसाच गेला

    रवींद्र जडेजानंतर मोहम्मद शमी मैदानात उतरला. पण काही खास करू शकला नाही. अवघी एक धाव करून तंबूत परतला.

  • 29 Oct 2023 05:08 PM (IST)

    Ind Vs Eng ICC World Cup live score : रवींद्र जडेजा बाद

    रवींद्र जडेजा 8 धावा करून बाद झाला. अदिलच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला.

  • 29 Oct 2023 05:04 PM (IST)

    Ind Vs Eng ICC World Cup live score : रोहित शर्मा 87 धावा करून तंबूत

    रोहित शर्मा 87 धावा करून तंबूत परतला आहे. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्याचं सूर्यकुमार यादव आणि रवींद्र जडेजासमोर आव्हान आहे.

  • 29 Oct 2023 04:24 PM (IST)

    Ind Vs Eng ICC World Cup live score : लोकलबॉय के एल राहुल आऊट

    आता कुठे डाव सावरला असं वाटत असताचा के एल राहुल मोठा फटका मारण्याच्या नादात ३९ धावांवर आऊट झाला. भारताला चौथा झटका बसला असून आता मैदानात रोहित आणि सूर्यकुमार यादव खेळत आहेत.

  • 29 Oct 2023 03:55 PM (IST)

    India vs England live score | रोहित शर्माचं अर्धशतक

    रोहित शर्मा याने इंग्लंडविरूद्ध अर्धशतक केलं असुन संघाचा डाव सावरला आहे. रोहित आणि केएल राहुल आता मैदानात भाराताच्या डावाची धुरा सांभाळत आहेत.

  • 29 Oct 2023 03:51 PM (IST)

    India vs England Cricket Match live score : अय्यर आऊट

    भाराताला तिसरा झटका बसला असून श्रेयस अय्यर आऊट झाला आहे. भारतीय संघाच्या अडचणीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.

  • 29 Oct 2023 02:50 PM (IST)

    India vs England Cricket Match live score : दोन मुंबईकरांवर टीम इंडियाची मदार

    आता संघाची मदार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यावर असणार आहे. शुबमन गिल आणि विराट कोहली लवकर बाद झाल्याने संघ आता अडचणीत सापडला आहे.

  • 29 Oct 2023 02:37 PM (IST)

    India vs England ICC Match live score : किंग कोहली शून्यावर आऊट

    भारताला दुसरा झटका बसला असून किंग विराट कोहली  शून्यावर आऊट झाला आहे. डेव्हिड विलीने त्याला आऊट करत संघासाठी महत्त्वाचं यश मिळवलं  आहे.

  • 29 Oct 2023 02:24 PM (IST)

    Ind Vs Eng ICC World Cup live score : टीम इंडियाला पहिला झटका, गिल बोल्ड

    शुबमन गिल 9 धावांवर आऊट झाला असून संघाला पहिला झटका बसला आहे. ख्रिस वोक्स याने त्याला आऊट केलं आहे. मैदानात आता विराट कोहली आला आहे.

  • 29 Oct 2023 02:00 PM (IST)

    Ind Vs Eng World Cup 2023 live score : सामन्याला सुरूवात, ओपनर मैदानात

    सामन्याला सुरूवात झाली असून कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल मैदानात उतरले आहेत. तर इंग्लंडकडून डेव्हिड विली पहिली ओव्हर टाकत आहे.

  • 29 Oct 2023 01:39 PM (IST)

    India vs England ICC Match live score : दोन्ही संघात एकही बदल नाही

    भारत आणि इंग्लंड संघाने आजच्या सामन्यात मागील सामन्यातील संघ आजच्या सामन्यात कायम ठेवला आहे. आर. अश्विन याला संघात जागा मिळणार याकडे बोललं जात होतं मात्र संघ व्यवस्थापनाने तोच संघ कायम ठेवला आहे.

  • 29 Oct 2023 01:35 PM (IST)

    Ind Vs Eng Toss : इंग्लंड संघाने जिंकला टॉस

    इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथ म फलंदाजी करताना किती धावा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 29 Oct 2023 01:33 PM (IST)

    India vs England ICC Match live score : विराट रचणार इतिहास

    विराट कोहली आज लखनऊमध्ये ४९ व्या  शतकाला गवसणी घालणार की नाही याकडे अवघ्या क्रिकेट जगताचंं लक्ष लागलं आहे. विराटा या शतकासह इतिहास रचणार आहे.

Published On - Oct 29,2023 1:30 PM

Follow us
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.