India vs England Odi Series 2021 | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड, एकूण 100 वेळा आमनेसामने, कोण वरचढ, कोण कमजोर?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला (india vs england odi series) 23 मार्चपासून सुरुवात होत आहे. आतापर्यंत उभय संघात एकूण 100 एकदिवसीय सामने (head to head records) खेळवण्यात आले आहेत.

India vs England Odi Series 2021 | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड, एकूण 100 वेळा आमनेसामने, कोण वरचढ, कोण कमजोर?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला (india vs england odi series) 23 मार्चपासून सुरुवात होत आहे. आतापर्यंत उभय संघात एकूण 100 एकदिवसीय सामने (head to head records) खेळवण्यात आले आहेत.
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 5:21 PM

पुणे : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 23 मार्चपासून 3 एकदिवसीय (India vs England Odi Series 2021) सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. हे तिनही सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Maharashtra Cricket Association) गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. दरम्यान टीम इंडियाने याआधीच्या कसोटी आणि टी 20 सीरिजमध्ये इंग्लंडला पराभूत केलं आहे. त्यामुळे टीम इंडियाचा विश्वास दुणावलेला आहे. या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियामध्ये युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. यामुळे विराटसेना या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज आहे. तसेच इंग्लंडही या सीरिजमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. या निमित्ताने आपण या संघात आतापर्यंतची (India vs England Head To Head In Odi) एकदिवसीय मालिकेतील आकडेवारी पाहणार आहोत. (india vs england odi series 2021 head to head records)

अशी आहे आकडेवारी

उभय संघात आतापर्यंत एकूण 100 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडिया इंग्लंडवर वरचढ आहे. भारताने इंग्लंडचा 53 सामन्यात धुव्वा उडवला आहे. तर इंग्लंडने टीम इंडियावर 42 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. 2 सामने बरोबरीत सुटले आहेत. तर 3 सामन्यांचा निकाल लागला नाही.

इंग्लंडची भारतातील कामगिरी

इंग्‍लंडने टीम इंडिया विरुद्धात भारताता 48 वनडे मॅच खेळल्या आहेत. यापैकी 16 सामन्यांमध्ये इंग्लंडला विजय मिळवता आला आहे. तर 31 सामन्यांमध्ये भारताने इंग्लंडला पराभूत केलं आहे. तर एक मॅच टाय झाली होती.

वरील आकडेवारीवरुन टीम इंडिया इंग्लंडवर वरचढ दिसत आहे. त्यामुळे आता या एकदिवसीय मालिकेत टीम इंडिया ही कामगिरी कायम राखणार की इंग्लंड हा इतिहास बदलणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

पुण्यातील कामगिरी

उभय संघात पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये 1 वनडे सामना खेळवण्यात आला होता. हा सामना 15 जानेवारी 2017 मध्ये खेळला गेला होता. या सामन्यात भारताला विजयासाठी 351 धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र तरीही इंग्लंडला या धावसंख्येचा बचाव करता आला नाही. भारताने हा सामना 11 चेंडूआधी 7 विकेट्स गमावून जिंकला होता.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

23 मार्च | पहिली मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

26 मार्च | दूसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

28 मार्च | तिसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

इंग्लंडची 14 सदस्यीय टीम

इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियम लिविंगस्टोन, मॅट पर्किंसन, आदिल रशीद, बेन स्टोक्स, रीस टॉपले, मार्क वुड, ख्रिस जॉर्डन, जॅक बॉल आणि डेव्हिड मलान.

एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.

संबंधित बातम्या :

India vs England 1st Odi Playing 11 | इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोणाला संधी कोणाला डच्चू?

Virat Kohli | शतक एक फायदे अनेक, विराटला सेंच्युरी झळकावत अनेक रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

(india vs england odi series 2021 head to head records)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.