IND vs ENG : टीम इंडियाचं नवं वेगवान अस्त्र, वन डे मालिकेसाठी दोन नावं जवळपास निश्चित

India vs England ODI series : पुण्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा केली जाणार आहे.

IND vs ENG : टीम इंडियाचं नवं वेगवान अस्त्र, वन डे मालिकेसाठी दोन नावं जवळपास निश्चित
Ind vs Eng : वन डे मालिकेत कुणाकुणाला संधी मिळणार?
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 11:37 AM

पुणे : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सध्या टी 20 मालिका (Ind vs Eng 3rd T20) सुरु आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये वन डे मालिका (India vs England ODI series) रंगणार आहे. पुण्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा केली जाणार आहे. यामध्ये टी 20 प्रमाणे वन डे मालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची चिन्हं आहेत. कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) आणि बडोद्याचा अष्टपैलू कृणाल पंड्या (Krunal Pandya) यांना वन डे संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे वेगवान गोलंदाज आणि नुकतंच लग्नाच्या बेडीत अडकलेला जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू रवींद्र जाडेजा हे मात्र संघाबाहेरच असतील. (India vs England ODI series Prasidh Krishna and Krunal Pandya can get chance one day series )

क्रिकबज या वेबसाईटच्या माहितीनुसार, गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळवू शकतो. नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत कृष्णाने 14 विकेट्स घेतल्या होत्या. कृष्णा हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. कृष्णाशिवाय मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, टी नटराजन आणि भुवनेश्वर कुमार यांची निवड निश्चित मानली जात आहे.

जसप्रीत बुमराहचं 15 मार्चला लग्न झालं. त्यामुळे तो शेवटचा कसोटी सामना आणि पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेत खेळू शकला नाही. आता तो वन डे मालिकेतूनही सुट्टी घेणार आहे.

तर कृणाल पंड्या पहिल्यांदाच वन डे संघात 

तीन वन डे सामन्यांसाठी 18 जणांचा संघ निवडण्यात येणार आहे. यामध्ये कृणाल पंड्याचा समावेश झाला तर ही त्याची कारकिर्दीतील पहिलीच वन डे मालिका ठरेल. कृणाल पंड्याने यापूर्वी टी 20 मालिकेतून भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. कृणाल पंड्यानेही विजय हजारे ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्याने दोन नाबाद शतकं आणि दोन अर्धशतकं झळकावली होती. दुसरीकडे पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांनीही विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक धावा करुन, निवड समितीचं लक्ष पुन्हा वेधून घेतलं आहे.

जाडेजाचंही पुनरागमन नाही?

दरम्यान, या मालिकेत रवींद्र जाडेजाचं पुनरागमन होण्याची शक्यता कमी आहे. सध्या जे टी 20 संघात आहेत, त्यातील बरीच नावं वन डे मालिकेतही असतील. त्यामुळे जाडेजाला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जाडेजाला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. जाडेजाने सरावाला सुरुवात केली आहे. मात्र टीम मॅनेजमेंट कोणतीही घाईगडबड करण्याची शक्यता नाही.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीनही वन डे सामने पुण्यातील गहुंज स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. हे सामने 23,26 आणि 28 मार्चला होणार आहेत.

(India vs England ODI series Prasidh Krishna and Krunal Pandya can get chance one day series )

संबंधित बातम्या 

Ind vs Eng : हिटमॅन रोहित शर्मा तिसऱ्या T20 साठी मैदानात, ‘या’ धडाकेबाज फलंदाजाचा बळी?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.