IND vs ENG | टीम इंडियासाठी गूड न्यूज, तिसऱ्या सामन्यासाठी हा प्लेअर परतणार!
India vs England 3rd Test | भारतीय क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियात स्टार खेळाडूची एन्ट्री होणार असल्याचं निश्चित झालं आहे. जाणून घ्या तो नक्की आहे तरी कोण?
राजकोट | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यातील मालिका 1-1 ने बरोबरीत असल्याने रंगतदार स्थितीत आहे. आता या मालिकेतील तिसरा सामना हा 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघांचा मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ तगड्या प्लेईंग ईलेव्हनसह मैदानात उतरणार आहे. केएल राहुल हा तिसऱ्या सामन्यात दुखापतीमुळे खेळणार नाहीये. तर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे दोघेही मालिकेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा आधीच टेन्शनमध्ये आहे. मात्र आता रोहित शर्माला मोठा दिलासा मिळाला आहे.
टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा याच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. कुलदीप यादव याने जडेजाबाबत मोठी अपडेट दिली आहे. जडेजा 12 फेब्रुवारीपासून तिसऱ्या कसोटीसाठी जोरदार नेट्स प्रॅक्टीस करतोय. जडेजा तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहे. अशी माहिती कुलदीप यादव याने दिली आहे.
रवींद्र जडेजा याला हैदराबादमध्ये इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटीत दुखापत झाली होती. जडेजाला या दुखापतीमुळे विशाखापट्टणममध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटीत खेळता आलं नाही. दुसऱ्या कसोटीनंतर निवड समितीने इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित 3 सामन्यांमसाठी टीम इंडियाची घोषणा केली. निवड समितीने या टीममध्ये रवींद्र जडेजाची निवड केली. मात्र त्याच्यासाठी फिटनेस टेस्ट ही बंधनकारक असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं होतं. अद्याप जडेजाच्या फिटनेस टेस्टबाबत बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे कुलदीपने क्रिकेट चाहत्यांना दिलेली गूड न्यूज खरंच ठरते की नाही, याकडे क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे.
रवींद्र जडेजा तिसऱ्या कसोटीतून कमबॅक करणार!
Ravindra Jadeja fit and available for the Rajkot Test against England. pic.twitter.com/oyg2XIm1Wv
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 13, 2024
शेवटच्या 3 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, रवींद्र जडेजा (फिटनेसवर अवलंबून).
इंग्लंड क्रिकेट टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, ऑली रॉबिन्सन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.