IND vs ENG: भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) टी 20 मालिका सुरु आहे. त्याचवेळी सीनियर खेळाडू लंडनसाठी रवाना झाले आहेत. गुरुवारी टीम इंडियाचे सीनियर खेळाडू रोहित शर्मा, (Rohit Sharma) विराट कोहली (Virat kohli) आणि चेतेश्वर पुजारा लंडनसाठी रवाना झाले. 1 जुलैपासून टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. मागच्यावर्षी अपूर्ण राहिलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा कसोटी सामना आहे. टीम इंडिया या कसोटी मालिकेत 2-1 ने पुढे आहे. एजबेस्टन मध्ये होणाऱ्या कसोटी आधी टीम इंडिया एक सराव सामनाही खेळणार आहे. लीस्टरच्या मैदानावर हा सामना होईल. लंडनसाठी रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, प्रसिद्धा कृष्णा, केएस भरत, हनुमा विहारी हे खेळाडू रवाना झाले आहेत. संघातील अन्य खेळाडू हेड कोच राहुल द्रविड दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर इंग्लंडला रवाना होतील. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी शेवटचा टी 20 सामना होणार आहे.
आता बायो बबल संपला आहे. त्यामुळे टीम इंडिया सामान्य विमानाने लंडनला रवाना झाली. याआधी टीम इंडिया विशेष चार्टर विमानाने परदेशात जायची. भारतीय संघातील सर्व खेळाडूंची विमानात बसण्याआधी कोविड 19 ची चाचणी झाली. सर्वांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत. लंडनमध्ये पोहोचतल्यानंतर टीम लीस्टरला जाईल.
England bound ✈️
? ?: Snapshots as #TeamIndia takes off for England. ? ? pic.twitter.com/Emgehz2hzm
— BCCI (@BCCI) June 16, 2022
भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील उर्वरित एकमेव सामना 1 जुलैपासून खेळला जाणार आहे. त्याआधी टीम इंडिया लीस्टरमध्ये 24 जून पासून सराव सामना खेळेल. भारतीय संघ इंग्लंडमध्ये असतानाच, भारताचा आणखी एक संघ आयर्लंड विरुद्ध 24 आणि 26 जूनला टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे आहे.
इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडिया पहिला T 20 सामना साउथॅप्टन येथे 7 जुलैला खेळणार आहे.
दुसरा टी 20 सामना 9 जुलैला बर्मिघम येथे होणार आहे.
तिसरा टी 20 सामना 10 जुलैला नॉटिंघम येथे होणार आहे.
3 वनडे सामन्यांची सीरीज 12 जुलैपासून सुरु होईल. पहिला सामना लंडनमध्ये होईल
दुसरा सामना 14 जुलैला लॉर्ड्स येथे होईल.
तिसरा सामना 17 जुलैला मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड येथे होईल.