IND VS ENG T20 Live : भारताचं इग्लंडसमोर 199 धावांचं आव्हान, कुणी किती धावा चोपल्या? वाचा

या सामन्याच्या सुरूवातीलाच भारताला कर्णधार रोहित शर्माच्या विकेच्या रुपाने पहिला झटका मिळाला. त्यानंतर थोड्या फार अंतराने भारताने विकेट गमावल्या. अन्यथा भारताचा स्कोर आणखी मजबूत स्थितीत पोहोचला असता.

IND VS ENG T20 Live : भारताचं इग्लंडसमोर 199 धावांचं आव्हान, कुणी किती धावा चोपल्या? वाचा
IND VS ENG Image Credit source: bcci twitter
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 12:17 AM

मुंबई : भारत आणि इंग्लंड (IND VS ENG T20) यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना साउथॅम्प्टनच्या रोझ बाउल स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक (Rohit Sharama) जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतानं इग्लंडसमोर 199 धावांचं आव्हान दिलंय. हा सामना रोहित शर्माच्या पुनरागमनचा ठरला आहे, जो कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे एजबॅस्टन कसोटी सामन्याचा भाग होऊ शकला नाही. त्याचबरोबर डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला (Arshdip Singh) आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली आहे. इंग्लंडची कमान विकेट किपर जोस बटलरकडे आहे. या सामन्याच्या सुरूवातीलाच भारताला कर्णधार रोहित शर्माच्या विकेच्या रुपाने पहिला झटका मिळाला. त्यानंतर थोड्या फार अंतराने भारताने विकेट गमावल्या. अन्यथा भारताचा स्कोर आणखी मजबूत स्थितीत पोहोचला असता.

हार्दिक पांड्याची शानदार हाफ सेंच्युरी

भारताचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या आज जबरदस्त फॉर्ममध्ये दिसून आला. हार्दिक पांड्याने आज शानदार अर्धशतक झळकावले. त्याने तुफान फटकेबाजी करत 30 चेंडून आपली हाफ सेंच्युरी ठोकली. हार्दिकचा गेल्या काही दिवसातला खेळ अतिशय चांगला राहिला आहे.

रोहित शर्मा पुन्हा स्वस्तात बाद

कर्णधार रोहित शर्मा आज पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाल्याचे दिसून आले. रोहित शर्माने रीस टोपलीच्या पहिल्या ओव्हरमध्येच सलग 2 चौकार मारले. या ओव्हमध्ये एकूण 11 धावा झाल्या. त्यानंतर मात्र रोहित शर्मा तंबूत परतला. मोईन अलीने पहिल्याच ओव्हरमध्ये त्याची विकेट घेतली. तिसऱ्या ओव्हरमध्ये 5व्या चेंडूवर त्याने रोहित शर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रोहितने 14 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 24 धावा केल्या.

हार्दिक पांड्या, सुर्यकुमारची फटकेबाजी

हार्दिक पंड्याने मॅथ्यू पार्किन्सन्सच्या डावातील 10व्या षटकातील चौथ्या चेंडूवर चौकार मारून भारतीय संघाच्या 100 धावा पूर्ण केल्या. हार्दिकने चेंडू लाँग ऑफच्या दिशेने चौकार मारून पाठवला आणि संघाची धावसंख्या 3 गडी बाद 101 अशी झाली होती. टीम इंडियाने 10 षटकात 3 विकेट गमावत 105 धावा केल्या. मात्र सुर्यकुमार यादवच्या बाद होण्याने पुन्हा काही काळ धावसंख्या संथ झाली.

दीपक हुड्डाही पुन्हा चमकला

89 धावांच्या स्कोअरवर भारताला तिसरा धक्का बसला. 17 चेंडूत 33 धावा करून दीपक हुड्डा बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले. डावाच्या 9व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर दीपकने ख्रिस जॉर्डनकरवी टायमल मिल्सकरवी कॅचआऊट केले. भारतीय संघाची चौथी विकेट सूर्यकुमार यादवच्या रूपाने पडली. ख्रिस जॉर्डनच्या 12व्या ओव्हरमध्ये चौथ्या चेंडूवर तो जोस बटलरच्या हातात सुर्यकुमार कॅच देऊन बसला. त्याने 19 चेंडूंच्या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकार मारले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.