IND VS ENG T20 Live : टेस्टचा वचपा टी-20 मध्ये काढणार? टीम इंडिया आज पुन्हा इग्लंडला भिडली

बऱ्याच दिवसांनी या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे, जो कोरोना व्हायरसवर (Corona) मात करून मैदानात परतला आहे. रोहित शर्मा कोविड -19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एजबॅस्टन कसोटी सामन्यात सहभागी होऊ शकला नव्हता.

IND VS ENG T20 Live : टेस्टचा वचपा टी-20 मध्ये काढणार? टीम इंडिया आज पुन्हा इग्लंडला भिडली
Ind Vs Eng odi Image Credit source: bcci twitter
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 11:19 PM

मुंबई : भारत आणि इंग्लंड (IND VS ENG T20) यांच्यातील पहिला T20 सामना साउथहॅम्प्टनच्या एजिस बाउल स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharama) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दीपक हुडा आणि ईशान किशन क्रीजवर टिकलेले दिसून आले. पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग टीम इंडियासाठी पदार्पण करत आहे. रोहित शर्माने त्याला टी-20 कॅप दिली. या T20 मालिकेत भारतीय संघ एजबॅस्टन कसोटी सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याचा पुरेपर प्रयत्न करताना दिसेल. बऱ्याच दिवसांनी या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे, जो कोरोना व्हायरसवर (Corona) मात करून मैदानात परतला आहे. रोहित शर्मा कोविड -19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एजबॅस्टन कसोटी सामन्यात सहभागी होऊ शकला नव्हता.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

  1. भारत – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, अक्षर पटेल, सूर्य कुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.
  2. इंग्लंड – जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार), डेव्हिड मलान, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, टायमल मिल्स, मॅथ्यू पार्किन्सन, रीस टोपली.

बीसीसीआयचे ट्विट

भारताचं पारडं जड

रोहित शर्माच्या नेतृत्वात संघाने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या 11 टी-20 सामन्यांपैकी 7 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर इंग्लंडने केवळ 4 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या मागील तीन मालिकांबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाने तिन्ही मालिका जिंकल्या आहेत.

आधीच्या मलिकांमध्येही भारतच वरचढ

2021 मध्ये भारताने इंग्लंडचा 3-2 अशा फरकाने पराभव केला. त्याच वेळी, 2018 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली होती. यापूर्वी 2016-17 च्या भारत दौऱ्यात इंग्लंडला 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर येथेही भारताचाच वरचष्मा आहे. दोघांमध्ये आतापर्यंत 19 टी-20 सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने 10 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने 9 सामने जिंकले आहेत.

पहिल्या T20 मध्ये या भारतीय खेळाडूंना विश्रांती

पहिल्या T20 सामन्यासाठी अनेक भारतीय खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. हे खेळाडू दुसऱ्या T20 पासून भारतीय संघाचा भाग असतील. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांना पहिल्या T20 साठी संघात स्थान मिळालेले नाही.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.