India vs England T20I Series | टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी, ‘यॉर्कर किंग’ पुनरागमनासाठी सज्ज

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (india vs england t 20i 2021) यांच्यात सध्या टी20 मालिका खेळण्यात येत आहे. नटराजन (yorker king t natrajan) दुखापतीनंतर पुनरागमन करण्साठी सज्ज झाला आहे.

India vs England T20I Series | टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी, 'यॉर्कर किंग' पुनरागमनासाठी सज्ज
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (india vs england t 20i 2021) यांच्यात सध्या टी20 मालिका खेळण्यात येत आहे. नटराजन (T Natrajan) दुखापतीनंतर पुनरागमन करण्साठी सज्ज झाला आहे.
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 7:13 AM

अहमदाबाद : टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी आहे. दुखापतग्रस्त असलेला वेगवान गोलंदाज ‘यॉर्कर किंग’ थंगारासू नटराजन (T Natarajan) दुखापतीतून सावरला आहे. नटराजन पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाला ही दिलासा देणारी बातमी आहे. दरम्यान बीसीसीआयने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. नटराजनला टी 2o मालिकेआधी दुखापत झाली होती. त्यामुळे नटराजन बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीत (National Cricekt Academy) आपल्या फिटनेसवर मेहनत घेत होता. (india vs england t 20i 2021 yorker king t natrajan is set to comeback after injurey)

क्रिकइंफोच्या माहितीनुसार, नटराजन बंगळुरुवरुन अहमदाबादला रवाना झाला आहे. त्यामुळे आता नटराजन इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित टी 20 सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत नटराजनच्या रुपात दुसऱ्या यॉर्कर किंगचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

ऑस्ट्रेलियाविरोधात तिन्ही फॉरमेटमध्ये पदार्पण

नटराजनची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एक नेट (राखीव) बोलर म्हणून निवड करण्यात आली होती. या दौऱ्यात टीम इंडियाचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले. ही दुखापत नटराजनच्या पथ्यावर पडली. यामुळे नटराजनला एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी संघात पदार्पणाची संधी मिळाली. नटराजनने या संधीचं सोनं केलं. टीम मॅनेजमेंटने दाखवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला. नटराजनने निर्णायक क्षणी भारताला विकेट्स मिळवून दिले. त्याने पहिल्या टी 20 मालिकेत 6 विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याने कसोटीमध्येही पदार्पण केलं. नटराजन एकाच दौऱ्यात तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पण करणारा पहिला भारतीय ठरला.

आयपीएलमधील कामगिरी

थंगारासूने आयपीएलच्या 13 व्या मोसमात सनरायजर्स हैदराबादचं प्रतिनिधित्व केलं. दुखापतीमुळे या 13 व्या मोसमात गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाला. या दुखापतीमुळे भुवनेश्वरला या मोसमाला मुकावे लागले. भुवनेश्वर हैदराबादच्या गोलंदाजीचा कणा होता. मात्र या मुख्य गोलंदाजाच्या अनुपस्थितीत थंगारासूने उल्लेखनीय आणि लक्षवेधी कामगिरी केली. थंगारासूने या मोसमातील एकूण 16 सामन्यात 8.19 च्या इकॉनॉमी रेटने 16 विकेट्स घेतल्या.

थंगारासूला 2017 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघात समाविष्ठ करण्यात आलं. पंजाबने थंगारासूसाठी 3 कोटी मोजले. मात्र त्याला या मोसमात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. यानंतर तब्बल 2 वर्षांच्या अंतराने म्हणजेच 2020 मध्ये त्याने आयपीएलमध्ये कमबॅक केलं.

संबंधित बातम्या :

Thangarasu Natarajan | चाळीत टेनिस बोलने यॉर्करचा सराव, ऑस्ट्रेलियाविरोधात टी 20 पदार्पण, थंगारासू नटराजनची संघर्षकथा

T Natrajan | नटराजन प्रतिभावान खेळाडू, पण कसोटीत किती यशस्वी होईल माहिती नाही : डेव्हिड वॉर्नर

(india vs england t 20i 2021 yorker king t natrajan is set to comeback after injurey)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.