Virat Kohli | कर्णधार विराट कोहली ठरला ‘मॅन ऑफ द सीरिज’चा मानकरी

विराट कोहलीने ( virat kohli) इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत (india vs england t20 series 2021) एकूण 231 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने (man of the series) गौरवण्यात आले.

Virat Kohli | कर्णधार विराट कोहली ठरला 'मॅन ऑफ द सीरिज'चा मानकरी
विराट कोहलीने इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत (india vs england t20 series 2021 virat kohli) एकूण 231 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने (man of the series) गौरवण्यात आले.
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 12:27 AM

अहमदाबाद : भारताने पाहुण्या इंग्लंडला पाचव्या टी 20 सामन्यात 36 धावांनी (India vs Engaland 5th T20i) पराभूत केलं. भारताने इंग्लंडला विजयासाठी 225 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 188 धावाच करता आल्या. यासह भारताने ही 5 सामन्यांची मालिका 3-2 ने जिंकली. कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडियाने ही कामगिरी केली. या सामन्यात विराटने सर्वाधिक नाबाद 80 धावांची खेळी केली. विराटने सुरुवातीपासून या मालिकेत शानदार कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला मालिकावीर अर्थात मॅन ऑफ द सीरिज (Man Of The Series) पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. (india vs england t20 series 2021 virat kohli won the man of the series)

विराटची मालिकेतील कामगिरी

विराटने या 5 सामन्यांच्या मालिकेत एकूण 231 धावा केल्या. यामध्ये त्याने खणखणीत 3 अर्धशतकं झळकावले. विशेष म्हणजे विराट या तिनही वेळेस नाबाद राहिला. तसेच विराटने या पाचव्या सामन्यात 80 धावांच्या नाबाद खेळीसह अनेक विक्रम केले. विराट टी 20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. विराटच्या नावे यासह आता टी 20 मध्ये कर्णधार म्हणून 1 हजार 463 धावांची नोंद झाली आहे.

दरम्यान आता टी 20 मालिकेनंतर उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 23 मार्चपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील तिनही सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

23 मार्च | पहिली मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

26 मार्च | दूसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

28 मार्च | तिसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.

संबंधित बातम्या :

India vs England Odi Series 2021 | इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ गोलंदाजाला संधी

India vs England T20 Series 2021 | टीम इंडियाचा सलग सहावा टी 20 मालिका विजय

Virat Kohli | कोहलीचा ‘विराट’ कारनामा, अर्धशतकी खेळीसह रेकॉर्ड ब्रेक

(india vs england t20 series 2021 virat kohli won the man of the series)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.