Ind vs Eng Highlights Score T20 WC 2024 Semi-Final: इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री
Ind vs Eng LIVE Score T20 World Cup 2024 Highlights And Updates in Marathi: आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये टीम इंडिया-इंग्लंड आमनेसामने होते. टीम इंडियाने हा सामना 68 धावांनी जिंकला आहे.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने गतविजेत्या इंग्लंडचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाने कॅप्टन रोहित शर्मा याच्या 57 आणि सूर्यकुमार यादव याच्या 47 धावांच्या जोरावर 7 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 171 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे इंग्लंडला 172 धावांचं आव्हान मिळालं. मात्र टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडने गुडघे टेकले. टीम इंडियाने इंग्लंडला 16.4 ओव्हरमध्ये 103 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाच्या अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या दोघांनी 3-3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह याने 2 विकेट्स घेतल्या. तर दोघांना रन आऊट केलं. टीम इंडियाने या विजयासह इंग्लंडने 2022 टी 20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये केलेल्या पराभवाचा वचपा घेत हिशोब बरोबर केला. आता टीम इंडियाची अंतिम फेरीत 29 जून रोजी दक्षिण आफ्रिके विरुद्ध लढत होणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
IND vs ENG Semi Final Live Updates: टीम इंडिया वर्ल्ड कप फायनलमध्ये
टीम इंडियाने इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करत टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडिया आता फायनलमध्ये 29 जून रोजी दक्षिण आफ्रिके विरुद्ध भिडणार आहे.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: लियाम लिविंगस्टोन रन आऊट
इंग्लंडने आठवी विकेट गमावली आहे. लियाम लिविंगस्टोन रन आऊट झाला आहे.
-
-
IND vs ENG Semi Final Live Updates: ख्रिस जॉर्डन आऊट
टीम इंडियाने इंग्लंडला सातवा धक्का दिला आहे. ख्रिस जॉर्डनला कुलदीप यादवने एलबीडब्लयू आऊट केलं आहे.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: इंग्लंडला सहावा झटका
इंग्लंडने सहावी विकेट गमावली आहे. कुलदीप यादवने हॅरी ब्रूकला बोल्ड केलं आहे.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: सॅम करन एलबीडब्ल्यू
कुलदीप यादव याने सॅम करन याला एलबीडब्लयू आऊट केलं आहे. कुलदीपची ही पहिली शिकार ठरली. इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला आहे.
-
-
IND vs ENG Semi Final Live Updates: मोईन अली आऊट
अक्षर पटेलने आठव्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर इंग्लंडला चौथा धक्का दिला आहे. ऋषभ पंतने मोईन अलीला 8 धावांवर स्टंपिंग केलंय.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: जॉनी बेयरस्टो डक
अक्षर पटेलने जॉनी बेयरस्टोला झिरोवर बोल्ड करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला आहे. अक्षर पटेलची ही दुसरी विकेट ठरली आहे.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: इंग्लंडची सलामी जोडी माघारी
टीम इंडियाने इंग्लंडची सलामी जोडी माघारी पाठवली आहे. अक्षर पटेलने जॉस बटलरला आऊट केलं. त्यानंतर जसप्रीत बुमराहने फिलिप सॉल्टला 5 धावांवर बोल्ड केलंय.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: इंग्लंड कॅप्टन जॉस बटलर आऊट
अक्षर पटेल याने इंग्लंडची पहिलीच आणि मोठी शिकार केली आहे. अक्षरने कॅप्टन जॉस बटलर याला विकेटकीपर ऋषभ पंत याच्या हाती कॅच आऊट केलं. बटलरने 23 धावा केल्या.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात
इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कॅप्टन फिलीप सॉल्ट आणि कॅप्टन जॉस बटलर ही सलामी जोडी मैदानात आली आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं आहे.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: शिवम दुबे गोल्डन डक
शिवम दुबे पहिल्याच बॉलवर आला तसा गेला आहे. शिवम गोल्डन डक झाला आहे.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: हार्दिक पंड्या आऊट
टीम इंडियाला पाचवा धक्का लागला आहे. उपकर्णधार हार्दिक पंडया कॅच आऊट झाला आहे. हार्दिकने 13 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 1 फोरसह 23 धावांची खेळी केली.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: सूर्यकुमार यादव आऊट
टीम इंडियाने चौथी विकेट गमावली आहे. सूर्यकुमार यादव 47 धावा करुन माघारी परतला आहे.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: टीम इंडियाला धक्का, कॅप्टन रोहित आऊट
टीम इंडियाने तिसरी विकेट गमावली आहे. रोहित 57 धावा करुन क्लिन बोल्ड झाला. आदिल रशिदच्या बॉलिंगवर रोहित बोल्ड झाला.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: रोहित शर्माचं सिक्ससह अर्धशतक
रोहित शर्माने इंग्लंड विरुद्ध सिक्स ठोकून अर्धशतक ठोकलं आहे. रोहितने डावातील 13 व्या ओव्हरमध्ये सॅम करनच्या बॉलिंगवर सिक्स ठोकून अर्धशतक झळकावलं आहे.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: पावसामुळे आणखी 1 तास वाया गेल्यानंतर सामना सुरु
टीम इंडिया-इंग्लंड सामन्याला आधीच विलंबाने सुरुवात झाली. त्यानंतर सामना सुरु झाला मात्र 8 ओव्हरनंतर पुन्हा पावसाने एन्ट्री घेतली. पावसाने जवळपास तासापेक्षा अधिक वेळ वाया घालवल्यानंतर अखेर आता खेळाला सुरुवात झाली आहे.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: आठ षटकानंतर पावसाची हजेरी, पुन्हा एकदा सामन्यात खंड
भारताच्या डावातील 8 षटकं संपली असून 2 गडी गमवून 65 धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव मैदानात आहेत. पावसामुळे या सामन्याचं गणित बदलणार असल्याचं दिसत आहे. आऊटफिल्ड ओली झाल्याने दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं कठीण जाईल.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: पॉवर प्लेमध्ये टीम इंडियाला दोन धक्के
पॉवर प्लेमध्ये टीम इंडियाला दोन धक्के बसले. विराट कोहली आणि ऋषभ पंत स्वस्तात बाद झाले. त्यामुळे टीम इंडियाच्या धावगतीला खिळ बसली. भारताने 2 गडी बाद 46 धावा केल्या. आता भारतीय क्रीडारसिकांना रोहित शर्माकडून अपेक्षा आहेत.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: ऋषभ पंतही गेला फेल
विराट कोहलीनंतर ऋषभ पंतकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या मात्र त्यालाही काही खास करता आलं नाही. सहा चेंडूंचा सामना करून 4 धावा केल्या आणि तंबूत परतला.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: विराट कोहली आऊट
टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आहे. विराट कोहली पुन्हा अपयशी ठरला आहे. विराटने एक सिक्स ठोकून आक्रमकपणे खेळणार असल्याचं जाहीर केलं. मात्र विराट फार वेळ मैदानात टिकू शकला नाही. विराट क्लिन बोल्ड झाला. विराटने 9 बॉलमध्ये 9 धावा केल्या.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: टीम इंडियाची सावध सुुरुवात
कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली या टीम इंडियाच्या सलामी जोडीने इंग्लंड विरुद्ध सावध सुरुवात केली आहे. टीम इंडियाने 2 ओव्हरमध्ये 11 धावा केल्या आहेत.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), फिलिप सॉल्ट, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि रीस टोपले.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल
इंग्लंडने सेमी फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकला आहे. इंग्लंडने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: पावसामुळे टीम इंडिया-इंग्लंड टॉसला विलंब
टीम इंडिया-इंग्लंड सेमी फायनल सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. त्यामुळे 7 वाजून 30 मिनिटांनी होणाऱ्या टॉसला विलंब झाला आहे. आता क्रिकेट चाहत्यांना टॉस किती वाजता होणार? याची प्रतिक्षा आहे.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: सामन्याला वेळेवर सुरुवात होणार
टीम इंडिया-इंग्लंड सेमी फायनल सामन्यावर पावसाचं सावट आहे. गयानामध्ये गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस झाला आहे. मात्र आता पावसाने विश्रांती घेतली आहे. तसेच ब्रॉडकास्टर्सने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत झालेला पाऊस, पुन्हा तेवढाच बरसला तरी सामना वेळेवर सुरु होईल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.
-
IND vs ENG Semi Final Live Updates: इंग्लंड क्रिकेट टीम
इंग्लंड क्रिकेट टीम: जोस बटलर (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिलिप सॉल्ट, रीस टोपले आणि मार्क वुड.
-
IND vs ENG Live Updates: टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
-
इंडिया-इंग्लंडचा 24 वा टी20I सामना
टीम इंडिया टी20i क्रिकेटमध्ये इंग्लंडवर वरचढ राहिली आहे. उभयसंघात आतापर्यंत एकूण 23 सामने झाले आहेत. त्यापैकी टीम इंडयाने 12 सामने जिंकले आहेत. तर इंग्लडंनेही 11 वेळा विजय मिळवला आहे.
-
IND vs ENG Semi Final: सलग दुसऱ्यांदा इंडिया-इंग्लंड सेमी फायनलमध्ये, रोहितसेना वचपा घेणार?
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये टीम इंडिया-इंग्लंड सलग दुसऱ्यांदा आमनेसामने आहेत. याआधी 2022 साली झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडने भारताला पराभूत केलं होतं. त्यामुळे टीम इंडियाकडे यंदा गेल्या पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे, तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस पार पडणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट आहे.
Published On - Jun 27,2024 4:31 PM