India vs England T20I Series | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेआधी क्रिकेट चाहत्यांसाठी ‘गुड न्यूज’

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20 मालिकेतील (india vs england t20i series) सर्वच्या सर्व 5 सामने हे नरेंद्र मोदी स्टेडियमवर (narendra modi stadium) खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यांना स्टेडियममध्ये 50 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी गुजरात क्रिकेट असोसिएशनने (Gujarat Cricket Association) दिली आहे.

India vs England T20I Series | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेआधी क्रिकेट चाहत्यांसाठी 'गुड न्यूज'
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20 मालिकेतील (india vs england t20i series) सर्वच्या सर्व 5 सामने हे नरेंद्र मोदी स्टेडियमवर (narendra modi stadium) खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यांना स्टेडियममध्ये 50 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी गुजरात क्रिकेट असोसिएशनने (Gujarat Cricket Association) दिली आहे.
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 4:51 PM

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यासाठी (India vs England T20I Series) आता काही मिनिटं शिल्लक आहेत. टीम इंडियासह सर्वच क्रिकेट चाहते या सामन्यासाठी उत्सुक आहे. या उत्सुक असलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या संपूर्ण टी 20 मालिकेत क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामन्याचा आनंद घेता येणार आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनने (Gujarat Cricket Association) याबाबतची माहिती दिली आहे. या निर्णयामुळे चाहत्यांना आता थेट स्टेडियममधून आपल्या संघाला प्रोत्साहित करता येणार आहे. (india vs england t20i series Gujarat Cricket Association permitted only 50 percent Crowd in narendra modi stadium)

जीसीएने काय म्हटलंय?

या निर्णया संबंधात जीसीएने एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार, ” या टी 20 मालिकेतील सर्व सामन्यांसाठी स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के चाहत्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच कोरोना संबंधित सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. या नियमांची अंमलबजवणी करण्यासाठी विशेष फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. ही फोर्स स्टेडियममध्ये कोरोना नियमांचं पालन केलं जात आहे की नाही, यावर लक्ष देणार आहेत.”

प्रेक्षकांच्या आरोग्याशी तडजोड नाही

आम्ही प्रेक्षकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड करणार नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण स्टेडियम सॅनिटाईज करण्यात आला आहे. दरम्यान कसोटी मालिकेतील तिसरा आणि चौथा कसोटी सामना याच स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता.

स्टेडियमची क्षमता किती?

नव्याने बांधण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमची एकूण प्रेक्षक क्षमता ही 1 लाख 32 हजार इतकी आहे. त्यानुसार 50 टक्के चाहत्यांना परवानगी असणार आहे. म्हणजेच एकूण 66 हजार चाहत्यांना सामन्याचा आनंद घेता येणार आहे. दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियम सर्वच बाबतीत जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात खेळाडूंची काळजी घेतली जात आहे. तसेच सामने पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते स्टेडियममध्ये येतात. त्यामुळे सोशल डिस्टंस राखणं आव्हानात्मक ठरतं. स्टेडियममध्ये गर्दी होऊन नियमांचं उल्लंघन होऊ नये, यासाठी बीसीसीआय आणि स्थानिक क्रिकेट बोर्ड काळजी घेत आहे. दरम्यान टीम इंडिया विरुद्ध इंग्ंलंड यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत.

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

अशी आहे इंग्लंड टीम : इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.

संबंधित बातम्या :

Motera Stadium | जगातील सर्वात मोठं स्टेडियम मोटेरा, टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने भिडणार, वाचा का आहे खास

India vs England 1st T20I | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने, कोण वरचढ कोण कमजोर?

(india vs england t20i series Gujarat Cricket Association permitted only 50 percent Crowd in narendra modi stadium)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.