India vs England Test Series 2021 | इंग्लंडला अहमदाबादमध्ये पराभूत करण्यासाठी सज्ज, तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा
इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाची (India vs England Test Series 2021) घोषणा करण्यात आली आहे.
अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England Test Series 2021) यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 17 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दुखापतग्रस्त उमेश यादवचे संघात पुनरागमन झालं आहे. बीसीसीआयने (bcci) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (india vs england test series 2021 bcci announced team india for last two tests against england)
TEAM – Virat Kohli (Capt), Rohit Sharma, Mayank Agarwal, Shubman Gill, Cheteshwar Pujara, Ajinkya Rahane (vc), KL Rahul, Hardik Pandya, Rishabh Pant (wk), Wriddhiman Saha (wk), R Ashwin, Kuldeep Yadav, Axar Patel, Washington Sundar, Ishant Sharma, Jasprit Bumrah, Md. Siraj.
— BCCI (@BCCI) February 17, 2021
उमेश यादवचे पुनरागमन
वेगवान गोलंदाज उमेश यादवचे कमबॅक झाले आहे. उमेश ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापतग्रस्त झाला होता. दरम्यान तो आता या दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. उमेश यादव शार्दुल ठाकूरची जागा घेणार आहे. शार्दुलला आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी (Vijay Hazare Trophy 2o21) मुक्त करण्यात आलं आहे.
दरम्यान इंग्लंडने 16 फेब्रुवारीला तिसऱ्या कसोटीसाठीसाठी संघाची घोषणा केली होती. यामध्ये मोईन अलीने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. तर त्याच्या जागी आक्रमक विकेटकीपर फलंदाज जॉनी बेअरस्टोचे पुनरागमन केलं आहे.
5 नेट्स गोलंदाज
निवड समीतीने या उर्वरित 2 कसोटींसाठी 5 नेट्स गोलंदाजांसह २ राखीव खेळांडूना स्थान दिलं आहे. नेट्स बोलर्समध्ये संदीप वॉरियर, कृष्णप्पा गॉथम, अंकित राजपूत, आवेश खान आणि सौरभ कुमारचा समावेश आहे. तर रिझर्व्ह प्लेअर्समध्ये केएस भरत आणि राहुल चाहरचा समावेश आहे. तर अभिमन्यू इश्वरन, प्रियांक पांचाल आणि शाहबाज नदीमला विजय हजारे ट्रॉफीसाठी मुक्त केलं आहे.
तिसरी कसोटी 24 फेब्रुवारीपासून
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 24-28 फेब्रुवारीदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा डे नाईट सामना असणार आहे. गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे. जगातील सर्वात मोठ्या असणाऱ्या मोटेरा स्टेडियममध्ये या सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
मालिका बरोबरीत
4 सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील प्रत्येकी 1 सामना इंग्लंड आणि टीम इंडियाने जिंकला आहे. त्यामुळे मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. यामुळे तिसरा कसोटी सामना हा या मालिकेच्या दृष्टीने चुरशीचा असणार आहे.
तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया
विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हीसी), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धीमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
नेट बोलर | संदीप वॉरियर, कृष्णप्पा गॉथम, सौरभ कुमार, अंकित राजपूत आणि आवेश खान.
रिझर्व्ह प्लेअर्स | केएस भरत आणि राहुल चाहर.
तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड टीम :
जो रूट (कर्णधार), जेम्स एंडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक क्राउले, रोरी बर्न्स , बेन स्टोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, डॉम सिबले, बेन फोक्स, ओली स्टोन, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.
संबंधित बातम्या :
इंग्लंडला पराभूत करत टीम इंडियाची ICC World Test Championship रॅंकिंगमध्ये मोठी झेप
India vs England 2nd Test 4th Day | फिरकीसमोर इंग्लंडचं लोटांगण, दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरीत
(india vs england test series 2021 bcci announced team india for last two tests against england)