IND vs ENG | यार जडेजाsss IPL मध्ये नो-बॉल नाही टाकत, तू आता… भर सामन्यात रोहित जड्डूवर चांगलाच भडकला, पाहा Video
टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाला रोहित शर्माने चांगलंच सुनावलं. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला असून नो बॉलवरून रोहितने त्याला फैलावर घेतलं.
मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये तिसरा कसोटी सामना सुरू आहे. कसोटी सामन्यात टीम इंडियाने पकड मिळवलेली पाहायला मिळत आहे. टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या डावात 319 धावांवर ऑल आऊट केलंय. आता टीम इंडियाकडे आघाड असून परत एकदा टीम इंडिया बॅटींगसाठी उतरली आहे. या सामन्यातील कॅप्टन रोहित शर्मा याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रोहित जडेजावर भडकलेला दिसत आहे. रोहित जडेजावर का भडकला? नेमकं काय घडलं जाणून घ्या.
पाहा व्हिडीओ-:
Rohit Sharma represents whole of Dinda Academy when he says “Jaddu samajh ye T20 hai, idhar No balls allowed nahi” 🔥 pic.twitter.com/cQ4s3aJOGm
— Dinda Academy (@academy_dinda) February 16, 2024
इंग्लंंडचा संघ बॅटींग करत असताना 30 व्या ओव्हरमध्ये जडेजा बॉलिंग करत होता. या एकाच ओव्हरमध्ये जड्डूने एकाच ओव्हरमध्ये दोन नो बॉल टाकले. त्यामुळे कॅप्टन साहेब म्हणजेच रोहित भडकलेला दिसला. रोहितने आपल्या शैलीत जडेजावर निशाणा साधला. यार, हा जडेजा आयपीएलमध्ये इतके नो बॉल टाकत नाही आणि धपाधप नो बॉल टाकत असल्याचं रोहित आधी बोलला. त्यानंतर जड्डू टी- 20 समजून बॉलिंग कर, असं रोहित त्याला म्हणाला.
रोहित शर्मा जे बोलला ते ऐकूण कॉमेट्री करणारेही हसू लागले. रोहित शर्मा फिल्डिंग करत असताना अनेकदा आपल्याच खेळाडूंची खेचताना दिसतो. स्टंम्पजवळ असलेल्या माईकमध्ये रेकॉर्ड झाल्यावर हे व्हायरल झाल्याशिवाय काही राहत नाही.
सामन्याचा धावता आढावा
टीम इंडियाने पहिल्या डावात 445-10 धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी शतके केली होतीत. त्यानंतर इंग्लंड संघाचा डाव 319-10 आटोपला. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट तर कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.