मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारत आज आपला दुसरा सामना खेळतोय. हाँगकाँगचा (India vs Hongkong) कॅप्टन निझाकत खानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्धारीत 20 ओव्हर्स मध्ये भारताचा 2 बाद 192 धावा झाल्या आहेत. भारताने हाँगकाँग समोर विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) स्फोटक फलंदाजीच्या बळावर भारताला हे लक्ष्य उभारतला आलं. बऱ्याच काळापासून फॉर्मसाठी तरसणाऱ्या विराट कोहलीने दुबळया हाँगकाँग विरुद्ध अर्धशतक झळकावलं. त्याने 44 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. यात एक चौकार आणि तीन षटकार आहेत. सूर्यकुमार यादवने हाँगकाँगच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. चौफेर फटकेबाजी केली. 26 चेंडूत नाबाद 68 चोपल्या. यात 6 फोर, 6 सिक्स आहेत.
कॅप्टन रोहित शर्मा आणि सलामीवीर केएल राहुल फार चमकदार कामगिरी करु शकले नाहीत. रोहित शर्माच्या रुपाने भारताचा पहिला विकेट गेला. रोहित शर्मा 13 चेंडूत 21 धावांवर आऊट झाला. त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. आयुष शुक्लाने त्याला एझाझ खानकरवी झेलबाद केलं. रोहित शर्माने आज 36 धावांची खेळी केली. पण ती टी 20 क्रिकेटला अजिबात साजेशी नव्हती. त्याने 36 धावांसाठी 39 चेंडू घेतले. त्याला एकही चौकार लगावता आला नाही. फक्त दोन षटकार मारले.
आयपीएल मध्ये आक्रमक फलंदाजी करणारा हाच तो केएल राहुल का? अशा प्रश्न त्याची फलंदाजी पाहून पडतो. पाकिस्तान विरुद्ध पहिल्या सामन्यात राहुल शुन्यावर पॅव्हेलियन मध्ये परतला होता. हाँगकाँग सारख्या संघाविरुद्ध राहुलची खेळी इतकी संथ असेल, तर पुढे श्रीलंका, बांगलादेशच आव्हान आहे. भारताने पहिल्या 10 ओव्हर्स मध्ये एक बाद 70 धावा केल्या.
कॅप्टन रोहित शर्माने आजच्या सामन्यासाठी संघात एकमेव बदल केला. मागच्या सामन्यात ऋषभ पंत नव्हता. हाँगकाँग विरुद्ध त्याचा संघात समावेश केला. पण त्यासाठी हार्दिक पंड्याला विश्रांती दिली. दिनेश कार्तिकही टीम मध्ये आहे.