मुंबई: भारताच्य बॅडमिंटन संघाने (Indian Badminton team) थॉमस कप स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 73 वर्षानंतर पहिल्यांदाच भारताचा तिरंग डौलाने फडकला आहे. बँकॉकमध्ये सुरु असलेल्या थॉमस कप (Thomas Cup) स्पर्धेची फायनल भारताने जिंकली आहे. भारताच्या बॅडमिंटनपटूनी आज जबरदस्त खेळ दाखवला. स्पर्धेतील निर्णायक, महत्त्वाच्या टप्प्यावर खेळाचा स्तर उंचावला. भारतीय बॅडमिंटनपटुंनी बलाढ्या इंडोनेशियाला 3-0 ने धुळ चारली. भारताच्या विजयात शेवटचा अध्याय किदाम्बी श्रीकांतने (Kidambi Srikanth) लिहिला. भारताने पहिल्यांदाच थॉमस कप स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं आहे. आजचा दिवस भारतात बॅडमिंटनसाठी ऐतिहासिक आहे.14 वेळच्या विजेत्या बलाढ्या इंडोनेशियाला नमवून हे यश कमावलं आहे. इंडोनेशियाचा मोठा नामवंत खेळाडू क्रिस्टीला श्रीकांतने सहज नमवलं. सामना तिसऱ्या गेमपर्यंतही गेला नाही. फक्त दोन गेममध्ये श्रींकातने क्रिस्टीवर विजय मिळवला.
HISTORY SCRIPTED ?❤️
Pure show of grit and determination & India becomes the #ThomasCup champion for the 1️⃣st time in style, beating 14 times champions Indonesia ?? 3-0 in the finals ?
It’s coming home! ??#TUC2022#ThomasCup2022#ThomasUberCups#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/GQ9pQmsSvP
— BAI Media (@BAI_Media) May 15, 2022
श्रीकांतने क्रिस्टी विरोधातील सामना 21-15 आणि 23-22 ने जिंकला. पहिल्या गेमवर तर श्रीकांतने पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. दुसरा गेम थोडा टाइट झाला. पण मोक्याच्याक्षणी श्रीकांतने कामगिरी उंचावली. एकवेळ असं वाटलं की, श्रीकांतला तिसरा गेम खेळावा लागेल. पण श्रीकांतने जोरदार कमबॅक केलं व चॅम्पियन म्हटल्या जाणाऱ्या खेळाडूचा किस्सा संपवला.
किदाम्बी श्रीकांत बरोबर लक्ष्य सेन आणि सात्विक-चिरागच्या जोडीचा सुद्धा हा विजय आहे. थॉमस कप ही सांघिक स्पर्धा आहे. एचएस प्रणॉयला फायनलमध्ये उतरण्याची वेळच आली नाही. आज भारताचं स्वप्न साकार झालं. या संघाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाचा, उर अभिमानाने भरुन आलेल्या प्रत्येक भारतीयाचा हा विजय आहे.
इंडोनेशिया विरुद्धच्या फायनलमध्ये लक्ष्य सेनने जोरदार सुरुवात केली. सात्विक आणि चिरागने लक्ष्यने सुरु केलेला विजयाचा होम कायम ठेवला. किदाम्बी श्रीकांतने तर कळसच चढवला. विजयाला किती वेळ लागतो, हे सर्वस्वी श्रीकांच्या खेळावर अवलंबून होतं. पण भारताच्या या स्टार बॅडमिंटनपटूने आज निराश केलं नाही. 130 कोटी भारतीयांना जी प्रतिक्षा होती. ते स्वप्न साकार केलं.