IND vs NZ 3rd ODI : टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये वनडे सीरीजमधला शेवटचा सामना इंदोर येथे खेळला जाणार आहे. भारताने पहिला सामना 12 धावांनी जिंकला. दुसरा सामना 8 विकेटने जिंकला. सीरीजमध्ये टीम इंडियाने आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. टीम इंडियासाठी आजचा सामना महत्त्वाचा आहे. कारण टीम इंडियाकडे क्लीन स्वीपची संधी आहे. टीम इंडियाने आजचा सामना जिंकला, तर ते टीम इंडिया वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचेल. याआधी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाने 3-0 असा मालिका विजय मिळवला होता. यंदाचा वनडे वर्ल्ड कप भारतात होणार. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वर्ल्ड कप भारतात होईल. त्या दृष्टीने न्यूझीलंड विरुद्धची वनडे सीरीज टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. वनडे मालिका संपल्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध तीन T20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे.
कोणी जिंकला टॉस?
तिसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकलाय. न्यूझीलंडन टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. त्यामुळे टीम इंडिया पहिली बॅटिंग करणार आहे.
रोहितने दोघांना दिली विश्रांती
रोहित शर्माने आजच्या सामन्यासाठी टीम इंडियात दोन बदल केले आहेत, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीला विश्रांती दिली आहे. त्यांच्याजागी उमरान मलिक आणि युजवेंद्र चहलचा टीममध्ये समावेश केलाय. आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका लक्षात घेऊन रोहितने सिराज आणि शमीला विश्रांती दिलीय.
भारताची प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, उमरान मलिक
आज डबल सेंच्युरी होईल?
सीरीज विजयासह आजच्या मॅचमध्ये डबल सेंच्युरी होईल का? यावर सुद्धा लक्ष असेल. आम्ही यासाठी असं म्हणतोय, कारण या मैदानावर आधी एक डबल सेंच्युरी झाली आहे. टीम इंडियात सध्या असे तीन बॅट्समन आहेत, ज्यांनी डबल सेंच्युरी झळकवली आहे.
3RD ODI. India XI: R Sharma (c), S Gill, V Kohli, I Kishan (wk), SK Yadav, H Pandya, W Sundar, S Thakur, K Yadav, Y Chahal, U Malik. https://t.co/ojTz5RqWZf #INDvNZ @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 24, 2023
याच मैदानात झालीय द्विशतकाची नोंद
याच मैदानात इतिहासातील दुसऱ्या द्विशतकाची नोंद झाली होती. वनडे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने पहिला द्विशतक झळकावलं. त्याने मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतकी कामगिरी केली होती. त्यानंतर मध्य प्रदेशच्याच इंदोरमध्ये सचिनला आदर्श मानणाऱ्या विरेंद्र सेहवागने डबल सेंच्युरी झळकवली. सेहवागने 8 डिसेंबर 2011 मध्ये इंदोरच्या होळकर स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्ध डबल सेंच्युरी झळकवली होती. इंदोरच्या या मैदानात हाय स्केरिंग मॅचेस झाल्यात.