IND vs NZ : इंडिया-न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत 62 कसोटी सामने, सर्वात जास्त कुणी जिंकले?
India vs New Zealand Test Head To Head Record: न्यूझीलंडने टीम इंडिया विरुद्ध आतापर्यंत एकूण 62 कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी सर्वाधिक सामन्यात कुणाचा विजय झालाय? जाणून घ्या.
टीम इंडिया बांगलादेशनंतर आता मायदेशात पुन्हा एकदा कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया बांगलादेशनंतर आता न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये 2 हात करणार आहे. या मालिकेला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीप साखळीचा भाग असल्याने फार महत्त्वाची आहे. रोहित शर्मा हा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तसेच जसप्रीत बुमराह याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर टॉम लॅथम न्यूझीलंडची कमान सांभाळणार आहे. या मालिकेनिमित्ताने आपण उभयसंघात किती कसोटी सामने झाले आहेत? जाणून घ्या.
आकडेवारी काय सांगते?
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकूण 62 सामने खेळवण्यात आले आहेत.त्यापैकी 22 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने 16 वेळा टीम इंडियावर मात केली आहे. तर 27 सामने हे बरोबरीत सुटले आहेत. त्यामुळे विजयी आकडेवारी पाहता टीम इंडियाच न्यूझीलंडवर वरचढ असल्याचं स्पष्ट होतं.
न्यूझीलंडची भारतातील कामगिरी
न्यूझीलंडने भारतात 36 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी न्यूझीलंडला 2 सामन्यातच विजयी होता आलं आहे. न्यूझीलंडने 1969 साली नागपूर तर 1988मध्ये मुंबईत विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर न्यूझीलंडला एकदाही जिंकता आलेलं नाही.
गेल्या मालिकेत काय झालेलं?
दरम्यान न्यूझीलंड अखेरीस 2021 मध्ये भारत दौऱ्यावर आलेली. तेव्हा टीम इंडियाने ही मालिका 1-0 ने जिंकली होती. कानपूरमधील पहिला सामना हा अनिर्णित राहिला होता. तर वानखेडे स्टेडियममध्ये झालेली मॅच टीम इंडियाने 372 धावांच्या फरकाने जिंकली होती. मात्र यंदा पुन्हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचायचं असेल तर जिंकण्याशिवाय पर्याय नाही. टीम इंडियाला मालिकेतील सामने अनिर्णित सोडवणं किंवा पराभूत होणं हे परवडणार नाही.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.
कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडची सुधारित टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल (पहिल्या कसोटीसाठी), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, जेकब डफी, इश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.