IND vs NZ : सेमी फायनलमध्ये हे 5 खेळाडू चालले तर विषयच संपला, तुमच्या Dream 11 मध्ये घ्यायला हवेच
IND vs NZ Semi Final 2023 : भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या सेमी फायनल सामन्याकडे क्रिकेट जगताचं लक्ष लागलं आहे. कारण या सामन्यात यजमान भारतीय संघ ही सुवर्णसंधी सोडणार नाही, कारण मागील वर्षी वर्ल्ड कपमध्ये याच संघामुळे बाहेर पडावं लागलं होतं. या सामन्यामध्ये हे खेळाडू सामना पलटवू शकतात.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 चा सेमी फायनल सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्या दुपारी 1.30 वाजता या सामन्याला सुरूवात होणार आहे. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ एकमेकांना भिडले होते. त्यावेळी भारतीय संघाला किवींनी बाहेरचा रस्ता दाखवला होता. बुधवारी होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघातील या पाच खेळाडूंच्या कामगिरीवर कोण विजय मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे ड्रीम इलेव्हन लावतना या पाच खेळाडूंचा नक्की विचार करा, कारण सामन्याचा निकाल पालटवण्याची ताकद या खेळाडूंमध्ये आहे.
कोण आहेत ते खेळाडू?
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने संपूर्ण स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी केली आहे. सुरूवातील येत तोडफोड फलंदाजी करत एक टेम्पो सेट करून देतो. त्यामुळे मैदानातील इतर खेळाडूंवर जास्त दबाव येत नाही. बुधवारी होणाऱ्या सामन्यात रोहितसाठी खास बात म्हणजे वानखेडे त्याचं होम ग्राऊंड असणार आहे. आताचा त्याचा फॉर्म पाहता पठ्ठ्याने 121 च्या स्ट्राईक रेटने 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
किंग विराट कोहली वन डे क्रिकेटचा किंग असून पठ्ठ्यासाठी वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करण्याची संधी आहेच. जर कोहली चालला तर किवींना गुडघे टेकायला भाग पाडेल. या वर्ल्ड कपमध्ये विराटने दोन शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत. वन डे क्रिकेटमध्ये कोहलीने ४९ शतके केली आहेत. चाहते आता त्याच्या 50 व्या शतकासाठी आतुर आहेत.
भारताचा गोलंदाजीमधील हुकमी एक्का असलेल्या जसप्रीत बुमराहने वर्ल्ड कपमध्ये धारदार गोलंदाजी केली आहे. बुमराहला विरोधी संघाचे खेळाडू बचावात्मक खेळतात. याचा फायदा दुसऱ्या गोलंदाजाला होत असलेला पाहायला मिळतो. धावा काढायचा दबाव आल्यावर खेळाडू बुमराह सोडून इतर गोलंदाजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात मात्र यामध्ये ते फसतात. संघाला विकेट मिळून जाते. न्यूझीलंडच्या फलंदाजांना बुमराहची दहशत असेल.
वर्ल्ड कपमध्ये न्यझीलंड संघाचा युवा खेळाडू रचिन रविंद्र याने कमाल कामगिरी केली आहे. न्यूझीलंडकडून त्याने सर्वाधिक 565 धावा केल्या आहेत. आपल्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये त्याने तीन शतक आणि दोन अर्धशतके केली आहेत. इतकंच नाहीतर त्याने विकेटही घेत संघासाठी महत्त्वाची कामगिरी केली आहे. या खेळाडूवर सर्वांची नजर असणार आहे कारण लीग स्टेजमधील सामन्यात 95 धावा केल्या होत्या.
ट्रेंट बोल्ट याचा यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दबदबा दिसला नसला तरीसुद्धा त्याची ताकद सर्वांना माहित आहे. भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरला त्याने कित्येकवेळा उद्ध्वस्त केलं आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यामध्ये या सायलेंट किलरवर सर्वांची नजर असेल. संपूर्ण सामना एका झटक्यात तो फिरवू शकतो.