IND vs NZ | न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात भारताचा संभाव्य संघ, रोहित करणार दोन मोठे बदल?
IND vs NZ Prediction playing 11 : भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या सामन्यामध्ये रोहितसाठी आधीच डोकेदुखी वाढलेली असताना मोठं आव्हान उभं राहिलं आहे. रोहित शर्मा हा निर्णय घेणार की नाही आणि नेमका कोणता निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई : भारत आणि न्यूझीलंडमधील (IND vs NZ Playing 11) सामन्याला काही तासांचा अवधी बाकी आहे. रोहित शर्मा याच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघ दमदार कामगिरी करत आहे. मात्र उद्याच्या (रविवारी) होणाऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघामध्ये बदल झालेला पाहायला मिळणार आहे. बांगलादेशविरूद्धच्या सामन्यामध्ये ऑल राऊंडर खेळाडू हार्दिक पंड्याला दुखापत झाल्याने तो खेळणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. धर्मशाळा या मैदानावर हा सामना पार पडणार असून रोहितसमोर संघ निवडताना मोठा पेच निर्माण झाला आहे.
रोहितसमोर असणार मोठं टेन्शन
हार्दिक पंड्या याच्या जागी कोणाची निवड करायची? कारण पंड्यामुळे संपूर्ण संघ एकदम पूर्ण वाटत होता. कारण रोहितकडे सहा गोलंदाज आणि फलंदाजीमध्येही त्याचा पर्याय होता. मात्र त्याच्या अनुपस्थितीमुळे संघात त्याची जागी कोण भरून काढणार? पंड्याऐवजी सूर्याला संधी दिली कर संघामधील सहाव्या गोलंदाजीचा पर्याय रोहितकडे नाही. मग पाच गोलंदाजांना घेऊनच त्याला किवींविरूद्ध मैदानात उतरावं लागणार आहे.
भारतीय संघात बदल करायचा झाल्यास शार्दूल ठाकूर हा फॉर्ममध्ये दिसत नाही. त्यामुळे त्याच्या जागी संघाता वेगवान गोलंदाज मोहम्म शमी यालाही संधी मिळण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमी याला सिराजमुळे बाहेर बसावं लागलं आहे. मात्र रोहित शार्दूलला बाहेर बसवणार नाही कारण हार्दिकच्या जाण्याने फलंदाज कमी होत असल्याने आणखी एका ऑल राऊंडरला बाहेर बसवणार नाही. त्यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्यामध्ये संभाव्य प्लेइंग 11 अशी असू शकते.
टीम इंडियाचे प्लेइंग-11: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर/मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.