वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणार आहे. वर्ल्ड कपमध्ये आठव्यांदा भारत-पाक एकमेकांना भिडणार आहेत. अवघ्या क्रिकेट जगताचं लक्ष या सामन्याकडे लागलेलं आहे. या सामन्याआधी पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू शादाब खान याने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
भारताविरूद्ध खेळताना वेगळाच आनंद होतो. आता भारतात जावून खेळायचं असल्याने त्याचा वेगळा दबाव असणार आहे. आम्ही वर्ल्ड कप जिंकला तर भारताविरूद्धच्या पराभवाला काहीच अर्थ राहणार असल्याचं शादाब खान म्हणाला.
वर्ल्ड कप जिंकणं पाकिस्तानसाठी महत्त्वाचं असून तेच उद्दिष्ट असल्याचंही शादाब खानने म्हटलं आहे. शादाबच्या वक्तव्याची क्रिकेट वर्तुळाच एकच चर्चा आहे.
एकदिवसीय विश्वाच्या इतिहासात पाकिस्तानला भारताविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. पाकिस्तानला प्रत्येक वेळी पराभवाचा सामना करावा लागला आहे.
टीम इंडिया 12 वर्षांनंतर भारतात खेळणार आहे. 2011 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने भारतातच विश्वचषक जिंकला होता.