IND vs PAK : पाकिस्तानविरूद्ध रोहितला काळजावर दगड ठेवत घ्यावा लागणार मोठा निर्णय, नेमका कोणता?
Asia Cup IND vs PAK : पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यामध्ये आज कर्णधार रोहित शर्मा याची कसोटी असणार आहे. कारण रोहितला दोन मोठे निर्णय घ्यावे लागणार आहेत. या निर्णयाकडे क्रिकेट प्रेमींच लक्ष लागेललं आहे.
मुंबई : आशिया कप 2023 मध्ये भारत-पाक दुसरा हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. कोलंबोमध्ये प्रेमदासा स्टेडिअमवर होणाऱ्या सामन्याकडे अवघ्या देशाचं लक्षा लागलं आहे. आजच्या सामन्यात कोणते खेळाडू उतरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता संघामध्ये दोन बड्या खेळाडूंनी एन्ट्री केली आहे. त्यामुळे कोणत्या खेळाडूंची प्लेइंग 11 मधून पत्ता कट होणार? के.एल.राहुल आणि जसप्रीत बुमराह प्लेइंग 11 मध्य असतील. रोहित शर्माल प्लइंग निवडताना काळजावर दगड ठेवत मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे.
रोहित कोणता निर्णय घेणार?
पहिल्या मॅचमध्ये के. एल. राहुल उपलब्ध नव्हता तर त्याच्या जागी ईशान किशन याला संधी देण्यात आली होती. या सामन्यामध्ये ईशानने मिळालेल्या संधीचं सोनं केलं होतं. पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांनी टीम इंडियाच्या बॅटींग ऑर्डरला सुरूंग लावला होता. मात्र युवा ईशान आणि हार्दिक पंड्या यांनी 138 धाावांची निर्णायक भागीदारी करत संघाला आव्हानात्मक लक्षापर्यंत पोहोचवण्यास मदत केली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात ईशान की राहुल, रोहित कोणाला संधी देणार हे पाहावं लागणार आहे.
नेपाळविरूद्धच्या सामन्यामध्ये जसप्रीत बुमराह घरी गेला होता. तेव्हा त्याच्या जागी मोहम्मद शमी याला संघात स्थान मिळालं होत. मात्र आजच्या सामन्यात शमी-बुमराह यामधील बुमराहची प्लेइंग 11 मधील जागा पक्की आहे. मात्र सिराज आणि शमीमध्ये चढाओढ लागण्याची शक्यत आहे. दोन्ही बॉलर खेळवले तर शार्दुल ठाकूर याचं स्थान धोक्यात येऊ शकतं.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन: बाबर आझम (C), शादाब खान (VC), इमाम-उल-हक, फखर जमान, सलमान आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (K), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी. हॅरिस रॉफ.
टीम इंडिया संभाव्य प्लेइंग 11 : पाकिस्तानविरुद्ध भारताचे संभाव्य प्लेइंग-11: रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल/इशान किशन (K), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी/मोहम्मद सिराज.