IND vs PAK Weather Update : सामन्याआधी कोलंबोमधील वातावरणाबाबत मोठी अपडेट, सामना होणार की नाही?

Ind vs PaK : भारत आणि पाकिस्तान सामन्याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. या सामन्यावर पावसाचं संकट असताना हवामानाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

IND vs PAK Weather Update : सामन्याआधी कोलंबोमधील वातावरणाबाबत मोठी अपडेट, सामना होणार की नाही?
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 12:50 PM

मुंबई : आशिया कपमधील भारत-पाक सामन्याला काही तास बाकी आहेत. या सामन्यावर पावसाचं मोठं संकट आहे. याआधीचाही सामना पावसामुळे रद्द झालेला. रविवारी म्हणजे आज होणाऱ्या सामन्यादिवशीही कोलंबोमध्ये पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे भारत-पाक सामन्याला सोमवार राखीव दिवस ठेवला गेला आहे. मागील सामन्यातील हिशोब पूर्ण करायचा असून हवामानाचीही तशी इच्छा दिसत आहे. भारत-पाक सामन्याआधी कोलंबोमधील वातावरण एकदम नॉर्मल असून ऊन पडलं आहे.

आर. अश्विनने दिली अपडेट

टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू आर. अश्विन याने एक फोटो शेअर करत हवामानाची माहिती दिली आहे. फोटो पाहता आजचा सामन्यावरल पावसाचं सावट असेल मात्र संपूर्ण सामना आज होऊ शकतो असं दिसत आहे. परंतु शेवटी हवामान आहे, कधी बदलेल काही सांगता येत नाही. आर. अश्विन याने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

आज जर सामना होऊ शकला नाहीतर उद्यासाठी एक दिवस राखून ठेवला आहे. त्यामुळे आज जरी एक इनिंग झाल्यावर पाऊस आला तर दुसरी इनिंग सोमवारी होऊ शकते.  पाकिस्तान संघाने आजच्या संघासाठी प्लेइंग 11 जाहीर केली आहे.  बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), फहीम अशरफ, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रीदी आणि हॅरिस रॉफ.

टीम इंडिया संभाव्य प्लेइंग 11 : पाकिस्तानविरुद्ध भारताचे संभाव्य प्लेइंग-11: रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल/इशान किशन (K), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी/मोहम्मद सिराज.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.