IND VS PAK : शेवटी माती खाल्लीच, पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूचं इशान किशनसोबत गैरवर्तन, समोर आला व्हिडीओ
IND vs PAK : टीम इडिया आण पाकिस्तानमधील सामन्यामधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की, पाकिस्तानचा खेळाडू युवा ईशान किशनसोबत गैरवर्तन करत आहे.
मुंबई : आशिया कप 2023 मधील भारत-पाक हाय-व्होल्टेज सामन्यामध्ये सर्व प्रेक्षकांचा हिरमोड झाला. पावसाने केलेल्या तुफानी बॅटींगमुळे हा सामना रद्द करण्यात आला. टीम इंडिया बॅकफूटला पडली होती मात्र टीम इंडियाचा भावी कप्तान हार्दिक पंड्या आणि ईशान किशन यांनी डाव सावरला. दोघांच्या भागीदारीच्या जोरावर एक सन्मानजनक धावसंख्या टीम इंडियाला उभारता आली. सामना रद्द झाला पण पाकिस्तानच्या खेळाडूने चुकीचं वर्तन केलेलं पाहायला मिळालं. सामन्यातील एक व्हिडीओ आता सोशळ मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचा बॉलर हॅरिस रॉफ याने ईशानला आऊट केल्यावर त्याच्याकडे पाहत चुकीच्या पद्धतीने हातवारे केलेले दिसत आहेत. ईशान किशन याने पाकिस्तान खेळाडूंचा क्लास घेतला, 25 वर्षाचं तरूण पोरगं पहिलाच सामना पण तो डगमगला नाही. पठ्ठ्याने अर्धशतक केलंच होतं शतकही ठोकता ठोकता राहिलं.
ईशान किशन याने 81 बॉलमध्ये 82 धावा केल्या यामध्ये 9 चौकार आणि 2 षटकार मारले. संघाची अवस्था नाजूक असताना त्याने खेळपट्टीवर तग धरला आणि सामना भारताच्या पारड्यात झुकवला. पाकिस्तान संघाच्या बॉलर्सना त्याने विकेट दिली नाही. शतकाच्या जवळ आल्यावर त्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण तो कॅचआऊट झाला.
दरम्यान, ईशान आऊट झाल्यावर जात असताना सीनिअर खेळाडूंनी ईशानचं कौतुक करण्याऐवजी त्याच्याकडे चल निघ अशा पद्धतीचे हावभाव करत हातवारे केले. नेटकऱ्यांनी हॅरिस रॉफ याला धारेवर धरलं आहे. जर ईशान आणखी 2-3 ओव्हर टिकला असता तर गड्याचं शतक पक्क होतं आणि टीम इंडियाचा स्कोर 300 च्या पुढे जात होता.
हॅरिस रॉफची परत जिरवायला हवी, इशानला आऊट त्याच्याकडे पाहत चुकीचे हातवारे #INDVSPAK #RohitSharma #viratkholi #AsiaCup2023 #viral #म pic.twitter.com/kOgKLYwYKl
— Harish Malusare (@harish_malusare) September 2, 2023
पाकिस्तान संघ (प्लेइंग इलेव्हन) | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हॅरिस रॉफ.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, इशान किशन विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (उप कर्णधार),, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज