Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : पाकिस्तानविरूद्ध काय फायद्याची, पहिली बॅटींग की बॉलिंग? पाहा काय सांगतो पिच रिपोर्ट!

IND vs PAK ASIA CUP 2023 : भारत-पाक सामना ज्या मैदानावर होणार त्याचे सर्व रेकॉर्ड्स पाहा. आधी बॅटींग फायद्याची असणार की बॉलिंग? कोणता निर्णय ठरणार फायदेशीर? जाणून घ्या!

IND vs PAK : पाकिस्तानविरूद्ध काय फायद्याची, पहिली बॅटींग की बॉलिंग? पाहा काय सांगतो पिच रिपोर्ट!
तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे 3 संघ बी ग्रुपमध्ये आहेत. दोन्ही ग्रुपमधील पहिले 2 संघ सुपर 4 साठी क्वालिफाय करतील.
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 9:13 AM

मुंबई : आशिया कप 2023 मधील हाय व्होल्टेज सामना उद्या म्हणजेच 2 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्याकडे अवघ्या क्रिकेट जगताच लक्ष लागलेलं आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तान संघाने विजय मिळवला तर सुपर फोरमध्ये जागाल मिळवणारा तो पहिला संघ ठरेल. मात्र टीम इंडिया सहजासहज पाकिस्तान संघाला एन्ट्री करू देणार नाही. हा सामना श्रीलंकेत्या कॅन्डी मैदानावर होणार आहे. या मैदानावर टॉस जिंकला तर कोणता निर्णय योग्य ठरेल? हवामानाचा पिचवर काही परिणाम होणार का? पहिली बॅटींग करणं फायद्याचं की बॉलिंग? सर्वकाही सविस्तर जाणून घ्या.

कोणता निर्णय ठरणार फायद्याचा?

आशिया कपमधील दुसरा सामना बांगलादेश-श्रीलंका यांच्यामधील सामना याच मैदानावर झाला. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन सामन्यानंतर म्हणाला की, या पिचवर 220 धावा आम्हाला टक्कर देण्यासाठी पुरेशा होत्या. मात्र अवघ्या 164 धावांवरच त्यांचा डाव गडगडला. त्यामुळे भारत-पाक सामन्यासाठी दुसऱ्या पिचचा वापर केला तर चांगली गोष्ट असेल.

या मैदानावरील रेकॉर्ड पाहिले तर पहिल्यांदा ज्या संघाने 34 पैकी अवघे 14 सामने जिंकले आहेत. तर 19 सामने ज्यांनी पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला त्यांनी जिंकले आहेत. तर एक सामनाअनिर्णित राहिला आहे.

या रेकॉर्डवरून लक्षात येतं की दुसऱ्यांदा बॅटींग करण हे फायद्याचं ठरणार आहे. तर पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या संघाने जर 300 धावांपेक्षा जास्त धावा केल्या तरच विजय मिळवणं निश्चित आहे. या मैदानावर जवळपास 12 पेक्षा जास्तवेळा 300 पेक्षा जास्त धावा केल्या गेल्या आहेत. तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना फक्त तीनवेळा तीनशेचा आकडा पार करता आला आहे. यामध्ये फक्त श्रीलंकेच्या संघाने अफगाणिस्तान संघाविरूद्धच 314 धावांचा टार्गेट पूर्ण केलं होतं.

आशिया कप 2023 साठी अशी आहे टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).

नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले.