Asia Cup 2023 : यंदाचा आशिया चषक होणार नाही, पाकिस्तानचा BCCI वर मोठा आरोप!
Asia Cup 2023: आयपीएल 2023 दरम्यान आशिया कप 2023 संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे ही स्पर्धा रद्द होण्याचा धोका आहे.
मुंबई : यंदाच्या आशिया कप 2023 चं पाकिस्तानमध्य आयोजन करण्यात आलं आहे. मात्र पाकिस्तानमध्ये खेळायला जाण्यास टीम इंडिया तयार नसल्याचं बीसीसीआयने सांगितलं होतं. त्यानंतर पाकिस्तानने मग आम्ही भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही, असं म्हटलं होतं. बीसीसीआय पाकिस्तान विरुद्ध पाकिस्तानमध्ये खेळण्यास आधीपासूनच विरोधात होती. बीसीसाआयचा नकार होता. आम्ही पाकिस्तानमध्ये खेळणार नाही, अशी बीसीसीायच सचिव जय शाह यांची भूमिका होती. या भूमिकेवरुन तत्तकालिन पीसीबी अध्यक्ष रमीज राजा यांनी आम्हीपण भारतात होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार नाही, अशी आडमुठी भूमिका घेतली होती. त्यानंतर पीसीबीचे अध्यक्ष बदलले.
नजीम सेठी यांच्याकडे पीसीबीची सूत्र आली. सेठी यांनी या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी एसीसी आणि आयसीसी पदाधिकाऱ्यांसह बैठकही घेतली. त्यानंतर भारत पाकिस्तानचे सामने त्रयस्थ ठिकाणी आयोजन करण्यात येणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र तो विषय अजूनही निकाली निघाला नाही.
आता या दोन क्रिकेट संघांच्या वादात आशिया कप स्पर्धा रद्द होणार असल्याची माहिती समोर येत आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील राजकीय संबंध हे ताणले गेले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही संघात द्विपक्षीय मालिका झालेली नाही. यामुळे दोन्ही संघ हे फक्त आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेतच खेळतात.
बीसीसीआयचा प्लान बी काय?
दरम्यान आशिया कप स्पर्धेचं आयोजन रद्द केल्यास बीसीसीआयचा प्लान बी तयार आहे. बीसीसीआय एकूण 5 संघांना एकत्र घेऊन स्पर्धेचं आयोजन करण्याच्या तयारीत असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे. त्यामुळे आता आशिया कप स्पर्धेचं काय होणार, हे येत्या काही दिवसात निश्चित होईल.
आशिया चषक 2023 साठी, पाकिस्तान बोर्डाने बीसीसीआयला हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार आशिया कपमधील भारताचे सामने पाकिस्तानच्या बाहेर होणार आहेत. मात्र बीसीसीआयने हा प्रस्ताव फेटाळला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या हायब्रीड मॉडेलच्या प्रस्तावावर कायम राहिल्यास आशिया चषक यावर्षी होणार नाही. इतकंच नाही तर आशिया चषक रद्द केल्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डाने त्या खिडकीत पाच देशांदरम्यान बहुराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे, असंही या अहवालात म्हटलं असल्याची माहिती समजत आहे.
If PCB remains firm on the hybrid model, then 2023 Asia Cup might not take place
BCCI is prepared for its cancellation and have started planning a five-nation tournament, which would be held during the window vacated by Asia Cup
Read more: https://t.co/xG6pdEvsbJ@saleemkhaliq pic.twitter.com/U2PZzoQH1c
— Cricket Pakistan (@cricketpakcompk) May 1, 2023
दरम्यान, 2008 पासून भारतीय संघाचा पाकिस्तानसोबत सामना झालेला नाही. 2008 च्या आशिया चषकासाठी भारतीय संघ शेवटच्या वेळी पाकिस्तानला गेला होता. दोन्ही शेजारी देशांनी शेवटची मर्यादित षटकांची द्विपक्षीय मालिका 2012 मध्ये खेळली होती. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांनी गेल्या काही वर्षांत पाकिस्तानचे दौरे केले आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडिया पाकिस्तानलाही भेट देऊ शकते, अशी अपेक्षा सर्वांना वाटत होती. मात्र तसं काही झालं नाही.