IND vs PAK : रोहितने फोडला तरीपण अक्कल नाही आली, श्रेयससोबत गैरवर्तन करताच चाहत्यांची गर्जना
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये अनेक विक्रम रचले गेले, हाय-व्होल्टेज सामना झालाच नाही पण एक असा किस्सा झाला ज्यामध्ये पाकिस्तानच्या खेळाडूवर संपूर्ण स्टेडियममधील चाहते तुटून पडले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला. या सामन्यामध्ये कॅप्टन रोहित शर्माने तुफानी खेळी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांच्या चिंधढ्या उडवल्या. टी-२० स्टाईल फटकेबाजी करत सामना एकतर्फी केला होता.पाकिस्तानचा शाहिन आफ्रिदी, हॅरिस रॉफ आणि हसन अली एकालाही रोहितने सुट्टी दिल्ली नाही. गड्याने सगळ्यांचाच पक्का घाम काढला. रोहित आऊट झाल्यानंतर पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रॉफने श्रेयस अय्यरसोबत गैरवर्तन केलं. त्यानंतर श्रेयस काहीच बोलला नाही कारण रॉफला स्टेडियममधील चाहत्यांनी उत्तर दिलं होतं.
नेमकं काय घडलं?
रोहित शर्माने आपल्या 86 धावांच्या खेळीमध्ये सहा चौकार आणि सहा चौकार मारले. यातील हॅरिस रॉफलाचा तीन कडक सिक्स मारले होते. रोहित आणि श्रेयस मैदानात असताना ११ व्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर श्रेयस स्ट्राईकला होता, रॉफचा चेंडू त्याने डिफेंड केला तो चेंडू रॉफच्या हातात गेल्यावर त्याने श्रेयसच्या दिशेने फेकला.
पाहा व्हिडीओ-
Atleast this much entertainment is needed 😂😂😂one sided match meh #INDvsPAK #rauf #indvspak2023 #RohitSharma𓃵 pic.twitter.com/8Q22sLZd0x
— Sunny Leone (parody) (@IshitaG10) October 14, 2023
That Act By Haris Rauf 😐 #INDvPAK #ODIWorldCup2023 #ICCWorldCup2023 #INDvsPAK pic.twitter.com/QPzuQW3GHY
— RVCJ Media (@RVCJ_FB) October 14, 2023
हॅरिस रॉफ याने चेंडू फेकताच संपूर्ण स्टेडियममधील प्रेक्षकांनी आरडाओरडा करायला सुरूवात केली. स्वत: रॉफने मान खाली घातली आणि माघारी फिरला, आधीच रोहितकडून मार खाल्लेल्या रॉफने पुन्हा अशी गुर्मी दाखवल्याने चाहत्याने त्याला उत्तर दिलं. अय्यरच्या फलंदाजीवर याचा काही परिणाम झाला नाही. कारण त्यानेच विजयावर शिक्कमार्तब करताना विजयी चौकार मारला आणि आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.