सुपर 4 राऊंडमध्ये पाकिस्तानने भारताला पाच विकेटने हरवलं. भारताचं 182 धावांच लक्ष्य पाकिस्तानने 19.5 षटकात पार केलं. मोहम्मह रिझवान पाकिस्तानच्या विजयाचा नायक ठरला. त्याने 51 चेंडूत 71 धावा केल्या. पाकिस्तानने पाच विकेट आणि एक चेंडू राखून विजय मिळवला. गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारताने सामना गमावला. प्रथम फलंदाजी करताना विराटच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने पाकिस्तानला चांगलं टार्गेट दिलं होतं. पण मोहम्मद रिजवान 51 चेंडूत 71 धावा आणि मोहम्मद नवाज 20 चेंडूत 42 धावा यांनी भारताचा विजय हिरावला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 73 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ते दोघे बाद झाल्यानंतर खुशदील शाह नाबाद 14 आणि असीफ अली 16 यांनी पाकिस्तानचा विजय सुनिश्चित केला. पाकिस्तानने या विजयासह मागच्या सामन्यातील पराभवाची परतफेड केली.
सुपर 4 राऊंडमध्ये पाकिस्तानने भारताला पाच विकेटने हरवलं. भारताचं 182 धावांच लक्ष्य पाकिस्तानने 19.5 षटकात पार केलं. मोहम्मह रिझवान पाकिस्तानच्या विजयाचा नायक ठरला. त्याने 51 चेंडूत 71 धावा केल्या.
19 व्या षटकात भुवनेश्वर कुमारला दोन चौकार आणि षटकार बसला. पाकिस्तानच्या चार बाद 175 धावा झाल्या आहेत. पाकिस्तानला 6 चेंडूत 7 धावांची आवश्यकता.
18 षटकात पाकिस्तानच्या चार बाद 156 धावा झाल्या आहेत. खुशदील शाह आणि असीफ अलीची जोडी मैदानात आहे. पाकिस्तान विजयासाठी 12 चेंडूत 26 धावांची आवश्यकता आहे.
मोक्याच्याक्षणी भारताला पाकिस्तानची मोठी विकेट विकेट मिळाली. मोहम्मद रिजवानला हार्दिक पंड्याने पॅव्हेलियन मध्ये पाठवलं. त्याने 51 चेंडूत 71 धावा फटकावल्या. यात 6 चौकार आणि 2 षटकार आहेत. पंड्याने सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केलं. पाकिस्तानला विजयासाठी 18 चेंडूत 34 धावांची आवश्यकता आहे.
16 षटकात पाकिस्तानच्या तीन बाद 139 धावा झाल्या आहेत. 24 चेंडूत 43 धावांची आवश्यकता आहे.
भुवनेश्वर कुमारने डोकेदुखी ठरणारी मोहम्मद रिजवान आणि मोहम्मद नवाजची जोडी फोडली. भुवनेश्वर कुमारने नवाजला दीपक हुड्डाकरवी झेलबाद केलं. त्याने 20 चेंडूत 42 धावा केल्या. यात 6 चौकार आणि 2 षटकार आहेत.
15 ओव्हर मध्ये पाकिस्तानच्या दोन बाद 135 धावा झाल्या आहेत. युजवेंद्र चहलच्या एका षटकात तीन चौकार लगावले. या ओव्हर मध्ये 16 धावा निघाल्या.
14 षटकात पाकिस्तानच्या दोन बाद 119 धावा झाल्या आहेत. रिजवान-नवाजची जोडी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतेय.
पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने शानदार हाफ सेंच्युरी झळकवली. तो अजूनही मैदानात आहे. मोहम्मद नवाज सोबत जोडी जमली आहे. 13 षटकात दोन बाद 107 धावा झाल्या आहेत. रिझवान 52 आणि नवाज 24 धावांवर खेळतोय.
10 षटकात पाकिस्तानच्या 2 बाद 76 धावा झाल्या आहेत. फखर झमनला 15 धावांवर चहलने कोहलीकरवी झेलबाद केलं. मोहम्मद रिझवान नाबाद 35 आणि मोहम्मद नवाज 11 धावांवर खेळतोय.
पाकिस्तानने पावरप्लेच्या सहा षटकात एक बाद 44 धावा केल्या आहेत. मोहम्मद रिझवान 24 आणि फखर झमन 6 धावांवर खेळतोय.
पाकिस्तानची मोठी विकेट मिळाली आहे. कॅप्टन बाबर आजमला रवी बिश्नोईने तंबूत पाठवलं. बाबरने 10 चेंडूत 14 धावा केल्या. यात दोन चौकार आहेत. बिश्नोईने रोहित शर्माकरवी झेलबाद केलं.
देशाचे गृहमंत्री अमित शहा काही वेळातच मुंबई दाखल झाले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर अमित शहा यांचे स्वागत केले. विमानतळाबाहेर पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. अमित शहा हे उद्या लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत.
पाकिस्तानची फलंदाजी सुरु झाली आहे. मोहम्मद रिझवान आणि बाबर आजमची जोडी मैदानात आहे. 3 ओव्हर्स मध्ये पाकिस्तानच्या बिनबाद 19 धावा झाल्या आहेत.
भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 ओव्हर्स मध्ये 7 बाद 181 धावा केल्या. विराटने सर्वाधिक 60 धावा केल्या. रोहितने 28, केएल राहुलने 28 धावा केल्या. हार्दिक पंड्या आज शुन्यावर बाद झाला.
विराट कोहली 60 धावांवर रनआऊट झाला. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. 44 चेंडूत त्याने 60 धावा केल्या. यात चार चौकार आणि एक षटकार होता.
दीपक हुड्डा आऊट झाला. 14 चेंडूत त्याने 16 धावा केल्या. त्याने दोन चौकार लगावले. नसीम शाहच्या गोलंदाजीवर त्याने मोहम्मद नवाजकडे झेल दिला. 18.4 षटकात 6 बाद 168 धावा झाल्या आहेत.
भारताने 160 धावांचा टप्पा ओलांडला आहे. 18 ओव्हर्स मध्ये भारताच्या 5 बाद 164 धावा झाल्या आहेत. विराट कोहली-दीपक हुड्डाची जोडी मैदानात आहे. विराट कोहलीने सलग दुसर अर्धशतक झळकावलं. त्याने 36 चेंडूत 53 धावा केल्या. यात चार चौकार आणि एक षटकार आहे.
पाकिस्तानला भारताची मोठी विकेट मिळाली आहे. हार्दिक पंड्या आज शुन्यावर बाद झाला. हसनैनच्या गोलंदाजीवर त्याने मोहम्मद नवाजकडे झेल दिला. भारताच्या 14.4 षटकात पाच बाद 131 धावा झाल्या आहेत.
ऋषभ पंतचा रिव्हर्स स्विपचा फटका फसला आहे. त्याने शादाबच्या गोलंदाजीवर असीफ अलीकडे सोपा झेल दिला. ऋषभने 12 चेंडूत 14 धावा करताना 2 चौकार लगावले. टीम इंडियाच्या 14 षटकात चार बाद 126 धावा झाल्या आहेत.
13 षटकात भारताच्या 3 बाद 118 धावा झाल्या आहेत. विराट कोहली नाबाद 33 आणि पंत नाबाद 9 धावांवर खेळतोय.
भारताची दमदार फलंदाजी सुरु आहे. भारताच्या 11 षटकात 3 बाद 101 धावा झाल्या आहेत. कोहली 23 धावांवर खेळतोय. ऋषभ पंत मैदानात आला आहे. सूर्यकुमार यादव 13 धावांवर आऊट झाला.
केएल राहुल बाद झाला आहे. त्याने 28 धावा केल्या. 20 चेंडूत 28 धावा करताना त्याने एक चौकार आणि दोन षटकार लगावले. शादाब खानच्या गोलंदाजीवर त्याने मोहम्मद नवाजकडे झेल दिला.
पावरप्लेच्या पहिल्या 6 षटकात भारताची धावसंख्या 62/1 आहे. विराट कोहली आणि केएल राहुलची जोडी मैदानात आहे.
रोहित शर्माच्या रुपाने भारताचा पहिला विकेट गेला आहे. हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर रोहित 28 धावांवर झेलबाद झाला. त्याने 16 चेंडूत 28 धावा केल्या. यात 3 चौकार आणि 2 षटकार आहेत.
भारतीय सलामीवीरांनी अर्धशतकी भागीदारी केली आहे. पाच षटकात भारताच्या 54 धावा झाल्या आहेत.
रोहित शर्मा जबरदस्त फलंदाजी करतोय. चार षटकात भारताच्या बिनबाद 46 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मा 27 राहुल 19 धावांवर खेळतोय.
3 षटकात भारताच्या बिनबाद 34 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मा 16 आणि केएल राहुल 18 धावांवर खेळतोय.
दोन ओव्हर मध्ये भारताच्या बिनबाद 20 धावा झाल्या आहेत. केएल राहुल 5 आणि रोहित शर्मा 15 धावांवर खेळतोय. मोहम्मद हसनैनच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजांनी 9 धावा वसूल केल्या.
रोहित शर्माने धमाकेदार सुरुवात केली आहे. नसीम शाहच्या पहिल्या ओव्हर मध्ये भारताने बिनबाद 11 धावा केल्या. रोहितने एक चौकार आणि एक षटकार लगावला.
पाकिस्तानी संघात एक बदल करण्यात आला आहे. शाहनवाज दहानी दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे मोहम्मद हसनैनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन-बाबर आजम, मोहम्मद रिजवान, फखर जमां, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हारिस रऊफ, नसीम शाह आणि मोहम्मद हसनैन
भारत – रोहित शर्मा,(कॅप्टन) केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल,
आवेश खानला ताप आला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात तो खेळणार नाहीय.
पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजमने टॉस जिंकला आहे. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे. भारतीय संघात आज दोन बदल आहेत. दीपक हुड्डा आणि रवी बिश्नोईचा संघात समावेश करण्यात आला आहे.
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाचे वृत्त धक्कादायक आणि निःशब्द करणारे आहे. देशातील एका मोठ्या उद्यमशील घराण्यात जन्मून आपल्या कर्तव्य व कुशलतेने त्यांनी भारतीय उद्योग विश्वात आपला ठसा उमटवला होता. वडील पालनजी मिस्त्री यांच्या निधनानंतर अवघ्या दोन महिन्यात त्यांचे निधन व्हावे हा केवळ दैवदुर्विलास आहे. त्यांच्या निधनाने उद्योग आसमंतातील एक तेजस्वी तारा निखळला आहे. या अतिशय दुःखद प्रसंगी मी दिवंगत सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या तीव्र शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.
आता थोड्याच वेळात भारत वि पाकिस्तान सामना सुरु होईल. टी 20 मध्ये पंतला विकेटकीपर फलंदाज म्हणून पहिली पसंती नाहीय, हे राहुल द्रविड यांनी स्पष्ट केलय.
भारत आणि पाकिस्तानची टीम सुपर 4 च्या सामन्यात आमने-सामने येणार आहे. भारत-पाकिस्तान शिवाय अफगाणिस्तान आणि श्रीलंकेचा संघही सुपर 4 चा भाग आहे. सर्वच संघ परस्पराविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळणार आहेत. ज्या दोन टीम्सचे सर्वात जास्त अंक असतील, ते फायनल खेळतील.
विराट कोहली टी 20 क्रिकेट मधला चांगला खेळाडू नाहीय. तो वनडे मधला सर्वोत्तम खेळाडू आहे. टी 20 मध्ये त्याचा स्ट्राइक रेट खराब आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने हे वक्तव्य केलं आहे. या विधानाबद्दल क्रिकेट चाहते लतीफची खिल्ली उडवत आहेत.
भारत vs पाकिस्तान सामन्याआधी राहुल द्रविड यांनी विराट कोहलीबद्दल वक्तव्य केलं आहे. द्रविड यांनी सांगितलं की, कोहलीचं शतक किंवा अर्धशतक महत्त्वाचं नाही. त्याचं योगदान जास्त महत्त्वाच आहे.
आशिया कप स्पर्धेत दोन्ही टीम्स खेळाडूंच्या फिटनेसमुळे त्रस्त आहेत. आशिया कप आधी जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलला दुखापत झाली. पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम ज्यूनियर सुद्धा दुखापतीमुळे आशिया कपला मुकले. मागच्या रविवारी दोन्ही टीम्स मध्ये सामना झाला. त्यानंतर भारताचा रवींद्र जाडेजा आणि पाकिस्तानचा शहनवाज दहानी दुखापतीमुळे बाहेर गेले.
विराट कोहलीकडे या सामन्यात टी 20 क्रिकेट मध्ये 100 षटकार पूर्ण करण्याची संधी आहे. त्याने या फॉर्मेट मध्ये आतापर्यंत 97 षटकार मारले आहेत. त्याने आज तीन षटकार मारला तर सिक्सचं शतक तो पूर्ण करेल.