IND vs SA 2nd Test | रोहित शर्मा याचा एक चुकीचा निर्णय अन् टीम इंडियाचा पराभव निश्चित, कोणता जाणून घ्या
IND vs SA 2nd Test : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याआधी रोहित शर्माच्या एका निर्णयावर सर्वांचं लक्ष असणार आहे. मात्र हा निर्णय जर चुकला तर टीम इंडियाच्या पराभवाचं कारण ठरू शकतो, जाणून घ्या.
मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. पहिल्या कसोटीमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकावीच लागणार आहे. या सामन्यात पराभव झाला तर नववर्षाची सुरूवातही पराभवाने होणार आहे. मात्र रोहित शर्मा अँड कंपनी एका दमदार विजयाने वर्षाची सुरूवात करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. उद्याच्या सामन्यासाठी प्लेइंग 11 मध्ये दोन खेळाडूंमध्ये एकाची निवड करताना रोहितची कसोटी असणार आहे. रोहित कोणता निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हा आहे तो निर्णय?
पहिल्या सामन्यात गोलंदाज असोत किंवा फलंदाज सर्वांनीच निराशा केली. यामध्ये के. एल. राहुल याने पहिल्या डावातील शतक सोडंल तर अकराच्या अकरा खेळाडूंनी घोर निराशा केली. आफ्रिका संघाने एक डाव आणि 32 धावांनी मोठा विजय मिळवला. महत्त्वाचं म्हणजे तिसऱ्याच दिवशी टीम इंडियाचं बस्तान गुंडाळलं, आता दुसऱ्या कसोटीध्ये रोहितला दोन खेळाडूंमध्ये कोणला संधी द्यायची यासाठी मजबूत डोकं लावावं लागणार आहे.
कोण आहेत ते दोन खेळाडू?
हे दोन खेळाडू आर. अश्विन आणि शार्दुल ठाकूर आहेत. दोघांनीही काही कामगिरी केली नाही. पहिल्या सामन्यात १-१ विकेट घेतली. केप टाऊनच्या मैदानावर गोलंदाजांना चांगली मदत मिळत आहे. गेल्यावेळी कगिसो रबाडा आणि यान्सेन यांनी सात विकेट घेतल्या होत्या. तर टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराह याने चार डावात एकूण 10 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे रोहितने शार्दुलला खेळवावं , अशी चर्चा क्रीडाप्रेमी करत आहेत. रोहित शार्दुल याला बसवलं तर हा आत्मघातकी निर्णय ठरू शकतो.
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यामध्येही आफ्रिकेच्या डीन एल्गर याला शार्दुल ठाकूर यानेच माघारी पाठवलं होतं. ना बुमराह ना सिराज कोणालाच त्याची विकेट मिळाली नव्हती. दुसऱ्या सामन्यात लॉर्ड ठाकूर यालाच खेळवायला हवं. रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंट कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध्द कृष्णा, केएस भरत (WK), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान