‘ते सगळं ठिकाय, पण एक कॉलबॅक तर कर’, हिटमॅनच्या संसारातली हिट बायकोच्या कमेंटमध्ये!
भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची (India vs Sri Lanka T20I Series) मालिका गुरुवारपासून सुरू होत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका संपल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी भारतीय संघ श्रीलंकेसोबत दोन हात करणार आहे.
लखनौ : भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची (India vs Sri Lanka T20I Series) मालिका गुरुवारपासून सुरू होत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका संपल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी भारतीय संघ श्रीलंकेसोबत दोन हात करणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेप्रमाणे भारत या मालिकेचं यजमानपददेखील भूषवत आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी मंगळवारी भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला. रोहितच्या या फोटोवर त्याची पत्नी रितिका सजदेहने (Ritika Sajdeh) मजेशीर कमेंट केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मंगळवारीच लखनौला पोहोचला आहे. या मालिकेतील पहिला सामना येथील अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Atal Bihari Vajpayee Stadium) खेळवला जाणार आहे.
रोहितने आपल्या फोटोद्वारे चाहत्यांना संदेश दिला आहे. रोहितचे इंस्टाग्रामवर खूप चाहते आहेत. रोहितने संघाच्या सराव सत्रातील काही छायाचित्रेही शेअर केली आहेत. या फोटोसोबत रोहितने इंस्टाग्रामवर एक छोटीसं कॅप्शन दिलं आहे. रोहितने या कॅप्शनमध्ये लिहिल आहे – ‘Next UP लखनऊ’. यावर रितिकाने कमेंट केली आहे की, “हे सगळं चागलं आहे, पण तू मला एक कॉलबॅक करु शकतोस का? पलीज.”
रोहित आणि त्याची पत्नी (Rohit Sharma Wife Trolled) यांच्यातील मस्करी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहितची नुकतीच क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याने आधी मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये विराट कोहलीची जागा घेतली आणि त्यानंतर त्याला खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटचा म्हणजेच कसोटी संघाच कर्णधार बनवण्यात आले.
भारताचा टी-20 संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान
IND Vs SL मालिकेचे वेळापत्रक
- 24 फेब्रुवारी – पहिला T20 सामना, लखनौ
- 26 फेब्रुवारी – दुसरा T20 सामना, धर्मशाळा
- 27 फेब्रुवारी – तिसरा T20 सामना, धर्मशाळा
- 4-8 मार्च – पहिली कसोटी, मोहाली
- मार्च 12-16 – दुसरी कसोटी, बेंगळुरू (डे-नाईट)
इतर बातम्या
IND vs SL : ‘हिटमॅन’ शर्माकडे तीन विश्वविक्रमांची संधी, विराट, धवन, गप्टिलला मागे टाकणार?
ना रोहित, ना युवराज, IND vs SL T20 मधला सिक्सर किंग कोण? पाहा हिटिंग मास्टर्सची लिस्ट
IND vs SL : दीपक चाहरपाठोपाठ विस्फोटक फलंदाज संघाबाहेर, टीम इंडिया अडचणीत