Sa vs IND 1st ODI Live Streaming : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका पहिला वन डे सामना पाहा फुकटात, जाणून घ्या
Sa vs IND 1st ODI Live Streaming : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील वन डे सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. पहिला वन डे सामना आज होणार असून हा सामना किती वाजता आणि फुकटात कुठे पाहता येणार जाणून घ्या.
मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्याती वन डे मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. टी-२० मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली होती. आता वन डे मालिकेतील पहिला सामना सामना पार पडणार आहे. वन डे मालिकेमध्ये के. एल. राहुल टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. या मालिकेमध्ये युवा खेळाडूंना घेऊन राहुल मैदानात उतरणार आहे. पहिला वन डे सामना कधी केव्हा आणि कुठे पार पडणार जाणून घ्या.
टीम इंडिया वि. साऊथ आफ्रिका पहिला वन डे सामना कुठे पाहता येणार?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण डिस्ने प्लस हॉटस्टारवर OTT वर होईल. डिस्ने प्लस हॉटस्टारमध्ये, हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, तुम्ही तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत पाहू शकता.
टीम इंडिया वि. साऊथ आफ्रिका पहिला वन डे किती वाजता?
टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील वन डे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. तर एक वाजता सामन्याचा टॉस होणार आहे. टीम इंडियाने शेवटचा टी-२० सामना याच मैदानावर होणार होता.
टीम इंडिया वि. साऊथ आफ्रिका पहिला वन डे सामना कुठे होणार?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर होणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना सेंट जॉर्ज पार्क क्वेबेरा येथे होणार आहे. तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बोलंड पार्क पार्ल येथे खेळवला जाईल.
तीन सामन्यांच्या वन डे सामन्यांसाठी टीम इंडिया
केएल राहुल (कॅप्टन/विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (WK), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश सिंह, अरेश खान, आकाश दीप.