SA vs IND 2nd T20 | ‘…अन् आम्ही इथेच सामना गमावला’; सूर्यकुमारने या खेळाडूंंवर फोडलं पराभवाचं खापर!
sa vs ind 2nd t20 : टीम इंडियाचा आफ्रिका दौऱ्यावरील दुसऱ्या टी-20 सामन्यात पराभव झाला. या सामन्यामध्ये पावसाने खोडा घातलेला पाहायला मिळाला, टीम इंडियाला पावसाचा मोठा फटका बसला. पराभवानंतर सूर्याने कोणाला जबाबदार धरलं जाणून घ्या.
मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 5 विकेटने पराभव झाला. या सामन्यात टीम इंडियाने दमदार फलंदाजी केली होती. पावसाने खोडा घातला अन् चित्रच बदलेलं दिसलं, कारण टीम इंडियाच्या 180 धावा झाल्या होत्या. त्यावेळी रिंकू सिंह नाबाद 68 धावांवर खेळत होता. शेवटच्या ओव्हरमधील तीन बॉल बाकी होते. जरी तीनपैकी दोन सिक्सर बसले असते तरी 190 पेक्षा जास्त टार्गेट झालं असतं. मात्र डकवर्थ लुईसच्या नियमानुसार सुधारित लक्ष्य देण्यात आलं होतं. आफ्रिकेला 15 ओव्हरमध्ये 154 धावा करायच्या होत्या परंतु आफ्रिका संघाने 14 व्या ओव्हरमध्ये विजय मिळवला. या सामन्यानंतर बोलताना सूर्याने सामना कुठे निसटला यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
आमची बॅटींग झाल्यावर सामना अर्ध्या टप्प्यावर असताना मला वाटलं की ही टार्गेट बरोबर आहे. मात्र पहिल्या पाच ते सहा ओव्हरध्ये आफ्रिकेच्या खेळाडूंनी दमदार फलंदाजी केली अन् आमच्यापासून इथेच सामना दूर गेला. प्रत्येकाला सांगत होतो की, मोकळेपणाने खेळा स्वत: ला सिद्ध करा. चेंडू भिजल्याने आमच्या समोरील अडचणी वाढल्या होत्या. मात्र भविष्यात अशी परिस्थितींना सामोर जावं लागणार असल्याने रहा आमच्यासाठी एक चांगला धडा आहे. तिसरा टी-20 सामन्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचं सूर्यकुमार यादव म्हणाला.
दरम्यान, टीम इंडियाच्या गोलंदाजांचा सुरूवातीच्या ओव्हरमध्ये आफ्रिकेच्या फलंदाजांनी खरपूस समाचार घेतला होता. जेव्हा कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार यांनी विकेट घेतल्या तेव्हा टीम इंडियाने कमबॅक केलं होतं. मात्र अखेरच्या ओव्हरमध्ये धावा कमी पडल्याने टीम इंडियाच्या पदरी पराभव पडला. तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया कमबॅक करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडेन मारक्रम (कॅप्टन), मॅथ्यू ब्रीट्जके, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जानसेन, एंडिले फेहलुकवायो, गेराल्ड कोएत्जी, लिजाद विलियम्स आणि तबरेज शम्सी.