SA vs IND Dream 11 | शेवटच्या टी-20 सामन्यामध्ये लावा हा ड्रीम 11 संघ, होताल मालामाल
SA vs IND 3rd t20 : तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेमध्ये टीम इंडिया आणि साऊश आफ्रिका आज एकमेकांशी लढणार आहे. आज अखेरचा आणि तिसरा टी-20 सामना होणार असून या सामन्यासाठी Dream 11 लावत असाल तर खाली दिलेल्या संघाचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.
मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामना आज संध्याकाळी होणार आहे. आजचा सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा असून पहिला सामना पावसाने रद्द झाला होता. तर दुसऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवणं महत्त्वाचं आहे. कारण आजच्या सामन्यामध्ये विजय नाही मिळवला तर टीम इंडियाच्या हातातून मालिका जाणार आहे. आजच्या सामन्यासाठी ड्रीम 11 लावणार असाल कर खाली दिलेला संघाची तुम्हाला मदत होऊ शकते.
आजच्या सामन्यामध्ये सूर्यकुमार यादव याला कॅप्टन म्हणून घ्या. तर हेनरिक क्लासेन याला कीपर म्हणून घेत संघाचा उपकर्णधार करू शकता. बॅटींगमध्ये शुबमन गिल डेव्हिड मिलर, यशवी जैस्वाल, सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांना घ्या. तर रविंद्र जडेजाला ऑल राऊंडर म्हणून संधी दया तर गोलंदाज म्हणून रवी बिश्नोई, जेराल्ड कोएत्झी आणि अर्शदीप सिंग यांना घ्या.
आजच्या सामन्यामध्य प्लेइंग 11 मध्ये काही बदल झाला तर रवी बिश्नोई याला संघात जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या संघात त्याला तुम्ही नक्की घ्या. कारण ऑस्ट्रेलियावरूद्धच्या मालिकेमध्ये त्याने कडक कामगिरी केली होती. संध्याकाळी साडे आठ वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे.
यष्टिरक्षक: हेनरिक क्लासेन (VC) फलंदाज: शुबमन गिल, डेव्हिड मिलर, यशवी जैस्वाल, सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग अष्टपैलू: एडन मार्कराम, रवींद्र जडेजा गोलंदाज: रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, जेराल्ड कोएत्झी
तीन टी-20 सामन्यांसाठी भारताचा संघ: यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (WK), जितेश शर्मा (WK), रवींद्र जडेजा (VC), वॉशिंग्टन सन , रवी बिश्नोई , कुलदीप यादव , अर्शदीप सिंग , मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.