मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात आफ्रिकेने 5 विकेटने विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने 19.3 ओव्हरमध्ये 180 धावा केल्या होत्या. सामना सुरू असताना पावसाने खोडा घातला आणि डकवर्थ लुईस नुसार आफ्रिकेच्या संघाला 15 ओव्हरमध्ये 154 धावांचां सुधारित लक्ष्य देण्यात आलं होतं. या लक्ष्याचा बचाव करताना टीम इंडियाला अपयश आलं होतं. पावसामुळे चेंडू आफ्रिकेच्या फलंदाजांच्या बॅटवर चांगला येत होता त्यामुळे टीम इंडियाची गोची झाली होती. अशातच सूर्यकुमार यादव याने तिसऱ्या सामन्यासाठी प्लॅन रेडी असल्याचं सांगितलं आहे.
टीममधील सर्व खेळाडूंना सांगितलं आहे की, मालिका बरोबरीत सोडवायची असेल तर पॉवर प्ले चा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे. आफ्रिकेच्या संघाने पहिल्या पाच ते सहा ओव्हरमध्ये दमदार कामगिरी करत सामन्यावर पकड मिळवली होती. आम्हीसुद्धा अशाच प्रकारचा खेळणार असून तिसऱ्या टी-20 सामन्याची वाट पाहत असल्याचं सूर्या म्हणाला.
आम्ही केलेला स्कोर काही खराब नव्हता मात्र गोलंदाजी करणं आव्हानात्मक झालं होतं. संघातील सहकारी खेळाडूंना कन्मर्ट झोनमधून बाहर पडून खेळावं लागणार असल्याचं सांगितलं. ड्रेसिंग रूममधील वातवरण जर उत्साही असावं. त्यासाठी मैदानावर जे काही होईल ते तिथेच सोडायचं, असं सूर्याने सांगितलं.
दरम्यान, 14 डिसेंबर म्हणजे गुरूवारी हा सामना होणार असून संघाच्या प्लेइंग 11 मध्ये काही बदल पाहायला मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही सलामीवीर शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल शून्यावर बाद झाले होते. त्यामुळे ऋतुराज गायकवाड याला संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
3 टी-20 सामन्यांसाठी भारताचा संघ: यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (WK), जितेश शर्मा (WK), रवींद्र जडेजा (VC), वॉशिंग्टन सन , रवी बिश्नोई , कुलदीप यादव , अर्शदीप सिंग , मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.