IND vs SA | क्रिकेटमध्ये रचला जाणार इतिहास, आफ्रिकेविरूद्ध 11 खेळाडू एकाच दिवशी करणार डेब्यू
IND vs SA 1t20 11 player Debue : टीम इंडिया आफ्रिकेला रवाना झाली असून १० तारखेपासून टी-20 मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेमधील पहिल्या सामन्यातच मोठी इतिहासा होताना दिसणार आहे. नेमकं असं कसं? जाणून घ्या सविस्तर!
मुंबई : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. तिन्ही क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये बीसीसीआयने वेगवेगळ्या कॅप्टनची निवड करण्यात आली आहे. 10 तारखेपासून या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. मात्र टी- 20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदा संपूर्ण संघाचा डेब्यू सामना असणार आहे. प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की संपूर्ण संघ युवा असला तरी काही खेळाडूंनी तर आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जरी असं असलं तरीसुद्धा संपूर्ण संघ कसा काय एकाच दिवशी डेब्यू करणार जाणून घ्या.
दक्षिण आफ्रिकेसाठी निवडलेल्या टी-20 संघामध्ये 17 खेळाडूंची निवड झाली आहे. यामधील फक्त 6 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. इतर अकरा खेळाडूंचा पहिला सामना असणार आहे. संघाचा कॅप्टन असलेल्या सूर्यकुमार यादव याचाही यामध्ये समावेश होणार आहे. टी-20 सामना खेळणाऱ्या अकरा खेळाडूंचा दक्षिण आफ्रिकेमध्ये हा पहिला सामना असणार आहे.
पहिल्यांदा खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये रिंकू सिंग, इशान किशन, यशस्वी जयस्वाल, जितेश शर्मा, ऋतुराज गायकवाड यांचाही आफ्रिकेमध्ये पहिला सामना असणार आहे. ऑल राऊंडर्समध्ये वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मासुद्धा आपल्या करियरमध्ये आफ्रिकेमध्ये पहिला सामना खेळताना दिसतील. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्त्वाखाली युवा खेळाडूंनी बलाढ्य ऑस्ट्रिलिया संघाचा पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये 4-1 ने पराभव केला.
View this post on Instagram
टी-20 साठी भारताचा संघ: यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (WK), जितेश शर्मा (WK), रवींद्र जडेजा (VC), दीपक चहर , वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार.