IND vs SA 1st Test | आफ्रिकेविरूद्धचा पहिला कसोटी सामना पाहा फुकटात, कुठे आणि किती वाजता पाहता येणार?
sa vs ind 1st test : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील पहिल्या कसोटी सामनयाला उद्या सुरूवात होणार आहे. हा सामना किती वाजता सुरू होणार? कुठे पाहता येणार जाणून घ्या.
मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना उद्या म्हणजेच 26 डिंसेबरपासून सुरू होत आहे. टीम इंडियाला आफ्रिकेमध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. रोहित शर्मा अंँड कंपनीसाठी मोठी संधी असणार आहे. वर्ल्ड कपनंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह पहिल्यांदा मैदानात उतरणार आहेत. पहिला कसोटी सामना किती वाजता सुरू होणार? कुठे पाहता येणार जाणून घ्या.
टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील पहिला कसोटी सामना किती वाजता? कधी सुरू होणार?
पहिला कसोटी सामना मंगळवारी 26 डिसेंबरला असणार आहे. सेंच्युरियन या मैदानावर हा सामना होणार असून दोन्ही संघ कसोटीमध्ये पहिल्यांदा आमने-सामने आले आहेत.भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी खेळला जाईल? (IND विरुद्ध SA पहिली कसोटी, तारीख)
टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका कसोटी सामना किती वाजता सुरू होणार?
भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहू शकता. मोबाईलवर पाहण्यासाठी डिस्नी प्लस हॉटस्टार अॅपवर मोबाईल आणि लॅपटॉपवर लाइव्ह सामना पाहू शकता.
दोन्ही सामन्यासाठी टीम इंडियाचा संघ:-
टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (VC). ), प्रसिध कृष्णा आणि केएस भरत (WK).
संभाव्य प्लेइंग 11
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज