IND vs SA 2nd Test Playing 11 | दुसऱ्या कसोटीआधी दोन्ही संघात दोन मोठे बदल, दोन्ही संघांची प्लेइंग 11 जाणून घ्या
IND vs SA | टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला उद्या सुरूवात होणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडिया आणि आफ्रिका दोन्ही संघात दोन मोठे बदल होणार आहेत. कोणते ते जाणून घ्या.
मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्या म्हणजेच बुधवारी होणार आहे. हा सामना टीम इंडियाला जिंकावाच लागणार आहे. कारण पहिला कसोटी सामना टीम इंडियाने आधीच गमावला आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंट दुसऱ्या कसोटीमध्ये प्लेइंग 11 मध्ये बदल करणार यामध्ये काही शंका नाही. पण कोणत्या खेळाडूंना डच्चू दिला जाणार आणि कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संघामध्ये दोन मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
रोहित शर्मा करणार दोन मोठे बदल
प्रसिद्ध कृष्णा याच्या जागी मुकेश कुमार याला संघात जागा मिळण्याची शक्यता आहे. मुकेश कुमार याला संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे. कसोटीआधी झालेल्या वन डे मध्ये मालिकेमध्येही कुमारने चांगली गोलंदाजी केली होती. प्रसिद्ध याने कसोटीमध्ये पदार्पण केलं खरं पण त्याला छाप पाडता आली नाही. दुसरा बदल म्हणजे आर. अश्विन याच्या जागी रविंद्र जडेजा याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
आफ्रिका संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा दुखापती असल्याने पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी आफ्रिका संघात ट्रिस्टन स्टब्स याला संधी मिळू शकतो. जेराल्ड्स कोएत्झी बाहेर झाल्याने त्याच्या जागी संघात लुंगी एनगीडी याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
टीम इंडिया संभाव्य प्लेइंग 11 यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका संभाव्य प्लेइंग 11 एडन मार्कराम, डीन एल्गर (कर्णधार), टोनी डीजॉर्ज, कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को यान्सेन, कागिसो रबाडा, नंद्रा बर्गर, लुंगी एनगिडी.