SA vs IND 2 nd Test | रोहित शर्माने प्लेइंग 11 साठी लावलं ‘लय भारी डोकं’, सगळेच पडले संभ्रमात
IND vs SA 2nd Test : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील दुसऱ्या कसोटीमध्ये कॅप्टन रोहित शर्मा याने प्रसिद्ध कृष्णासह, रविंद्र जडेजा आणि मुकेश कुमार यांना संधी दिली आहे. त्यामुळे नेमकं कोणाला खाली बसवलं? हे जाणून घ्या.
मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं आहे. आफ्रिका संघाला अवघ्या 55 धावांमध्येच टीम इंडियाच्या गोलंदाजांनी गुंडाळलं. टीम इंडियाने आजच्या प्लेइंग 11 मध्ये बदल केला खरा पण अनेकजण अजुनही संभ्रमात आहे. रोहित शर्माने असं काय केलं की जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा आणि रविंद्र जडेजाही खेळत आहे. मग बाहेर कोणाला बसवलंय? जाणून घ्या.
रोहित शर्मा याने प्रसिद्ध कृष्णावर विश्वास दाखवला असून त्याला सलग दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये खेळण्याची संधी दिली आहे. पहिल्या कसोटीमध्ये कृष्णाला चमकदार कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे दुसऱ्या कसोटीमध्ये कृष्णा याच्या जागी मुकेश कुमार याला संधी दिली जाईल. मात्र आजच्या सामन्यामध्ये दोघांनीही प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं आहे.
आर. अश्विन याच्या जागी रविंद्र जडेजा याला संघात स्थान मिळालं. मग चार गोलंदाजांना कशी काय संधी मिळाली. याचं कारण म्हणजे शार्दुल ठाकुर आहे. शार्दुल याच्या खांद्याला सराव सत्रामध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे या सामन्यामध्ये तो बाहेर आहे. शार्दुल याच्या बाहेर जाण्यामुळेच रोहितने कृष्णाला एक संधी दिली आहे. रोहितला दुसरा पर्याय आवेश खान होता मात्र त्याने कृष्णाला संघात घेण्याचा निर्णय घेतला.
डीन एल्गर (कॅप्टन), एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी
रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार