IND vs SA : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यापैकी टी 20I मध्ये वरचढ कोण? पाहा आकडे
India vs South Africa Head to Head Record In T20i : मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर आता भारतीय चाहत्यांचं दक्षिण आफ्रिकेकडे लक्ष लागलं आहे. टीम इंडिया या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 सामन्यांची टी 20i सीरिज खेळणार आहे.
भारतीय क्रिकेट संघ टी 20i मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने दक्षिण आफ्रिकेत सरावाला सुरुवात केली आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 सामन्यांची ही टी 20i मालिका खेळणार आहे. सूर्यकुमार यादव भारताचं तर एडन मारक्रम दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडियाने याआधी सूर्याच्याच नेतृत्वात गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना हा 8 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. या मालिकेनिमित्ताने उभयसंघांची एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी राहिली आहे? हे जाणून घेऊयात.
आकडे कुणाच्या बाजूने?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 27 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. भारतानेच या 27 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 15 सामन्यात धुव्वा उडवला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने भारताला 11 सामन्यात पराभूत केलं आहे. तर 1 सामन्याचा निकाल लागला नाही. भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 बाद 237 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताने या धावा गुवाहाटीत झालेल्या सामन्यात केलेल्या. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची 92 ही सर्वात निच्चांकी धावंसख्या आहे.
भारताची दक्षिण आफ्रिकेतील कामगिरी
दरम्यान टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत एकूण 5 टी 20i मालिका खेळल्या आहेत. त्यापैकी टीम इंडियाने फक्त 1 मालिकाच गमावली आहे. तर टीम इंडियाने 3 मालिका जिंकल्या आहेत. तर एक मालिका बरोबरीत राहिली. टीम इंडियाने गमावलेली एकमेव मालिका ही केवळ एकाच सामन्याची होती. भारताने दक्षिण आफ्रिके एकूण 9 टी 20i सामने खेळले आहेत. त्यापैकी 6 सामने भारताने जिंकले आहेत.तर 3 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, अवेश खान आणि यश दयाल.
T20I सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, न्काबा पीटर, रायन सिमलेटन, रायन रिकेल लुथो सिपमला (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी) आणि ट्रिस्टन स्टब्स.