केपटाऊन: विराट कोहली (Virat Kohli) मैदानात असतो, तेव्हा प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू नेहमी टेन्शनमध्ये असतात. मैदानात विराट फलंदाजीसाठी क्रीजवर असेल किंवा कॅप्टनशिप करत असेल प्रतिस्पर्धी संघ नेहमीच दबावाखाली असतो. आज केपटाऊन कसोटीच्या (Cape Town Test) दुसऱ्यादिवशी सुद्धा हेच दिसून आलं. दक्षिण आफ्रिकेचे टेंबा बावुमा आणि किगन पीटरसनची जोडी जमली होती. त्यांची 42 धावांची पार्टनरशिपसुद्धा झाली होती. त्यावेळी मोहम्मद शमीने (Mohammed Shami) ही जोडी फोडली. भले विकेट शमीने घेतला असेल, पण शमीला तशी गोलंदाजी करण्यासाठी प्रेरित केलं ते विराटनं.
टाळ्या वाजवा
टी-ब्रेकच्या आधीच्या सत्रात विराटने सर्वच क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांमध्ये जोश निर्माण केला. विराटने तर डगआऊटमध्ये बसलेल्या खेळाडूंनाही टाळ्या वाजवायला सांगितल्या. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. टाळ्या वाजवत रहा असे विराटने खेळाडूंना सांगितलं.
मोहम्मद शमीची कमालीची गोलंदाजी
विराट कोहलीने खेळाडूंमध्ये जसा जोश भरला, तशी गोलंदाजांच्या बॉलिंगलाही धार आली. 56 व्या षटकात शमीने एका सुदंर आऊटस्विंगरवर टेंबा बावुमाला बाद केले. बावुमाचा कॅच कॅप्टन कोहलीने घेतला. या कॅचसह विराटने कसोटी क्रिकेटमध्ये 100 कॅच पूर्ण केल्या. शमीने बावुमाच्या विकेटनंतर लगेचच विकेटकिपर फलंदाज काइल वेरेनेला पंतकरवी झेलबाद केले व सामन्यावर भारताला पकड मिळवून दिली. टी-ब्रेकच्या आधी जसप्रीत बुमराहने एका सुंदर इनस्विंगरवर मार्को जॅनसेनला बोल्ड करुन दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर ढकललं.
Kohli celebrates the wickets.. looks towards his team dug out and shouts ‘Keep Clapping Boys.. Keep Clapping’ and this follows..
This guy just creates an amazing atmosphere in the match.. pic.twitter.com/ens77zqg3M
— Kanav Bali? (@Concussion__Sub) January 12, 2022
दुसऱ्यादिवसाची भारताने शानदार सुरुवात केली होती. बुमराहने एडेन मार्करामचा विकेट घेतला. त्यानंतर उमेश यादवने केशव महाराजला क्लीन बोल्ड केले. डुसेंला सुद्धा उमेशनेच तंबुचा रस्ता दाखवला. दक्षिण आफ्रिकेकडून पीटरसनने झुंजार 72 धावांची खेळी केली.