IND vs SA | बर्थ डे बॉय किंग कोहलीचं अर्धशतक, खास यादीमध्ये मिळवलं स्थान

| Updated on: Nov 05, 2023 | 4:45 PM

virat Kohli Half Century : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मॅचममध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे. भारताचा डाव कोलमडत असताना परत एकदा त्याने संकटमोचकाची भूमिका निभावली आहे.

IND vs SA | बर्थ डे बॉय किंग कोहलीचं अर्धशतक, खास यादीमध्ये मिळवलं स्थान
Follow us on

मुंबई : वर्ल्ड कपमधील भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील सामन्यामध्ये भारताने प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यामध्ये बर्थ डे बॉय विराट कोहली याने अर्धशतक केलं असून शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विरटने संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला असून अजूनही मैदानावर टिकून आहे. या अर्धशतकासह कोहला सर्वाधिक अर्धशतकांच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आला आहे. वाढदिवसा दिवशी वन डे मध्ये अर्धशतक करणारा तो भारताचा पाचवा खेळाडू ठरला आहे.

विराट कोहली याने 5 चौकारांच्या मदतीने 67 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराट वन डे मध्ये सर्वाधिक अर्धशतकांच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. कोहलीचं 119 वं अर्धशतक असून त्याने भारतात वन डे मध्ये 6000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. भारतसाठी सर्वात जास्त अर्धशतक करण्याच्या यादीमध्ये सचिन तेंडुलकर 145 अर्धशतकांसह पहिल्या स्थनावर आहे.

रोहित शर्मा याने सुरूवातीपासूनच आक्रमण सुरू केलं होतं. रोहित 40 धावांवर बाद झाल्यावर  गिलसुद्धा 23 धावा करून बाद झाला. त्यानंतर सिनर्स केशव महाराजा आणि शम्सी यांन कडक मारा करत धावांना ब्रेक लावला होता. मात्र कोहलीने सावध खेळ करत सिंगल डबल घेत डाव सांभाळला. अर्धशतक झाल्यावर  कोहली शतकाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (WK), टेम्बा बावुमा (C), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी