WTC 2025 : दक्षिण अफ्रिकेने टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीसठी कंबर कसली, भारताशी होणार सामना?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चुरस आहे. दक्षिण अफ्रिकेला अंतिम फेरी गाठणं सहज शक्य होणार आहे. असं असताना भारत आणि दक्षिण अफ्रिका पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

WTC 2025 : दक्षिण अफ्रिकेने टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीसठी कंबर कसली, भारताशी होणार सामना?
Follow us
| Updated on: Dec 18, 2024 | 5:43 PM

भारताने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेचा अंतिम फेरीत धुव्वा उडवून चषकावर नाव कोरलं होतं. आता पुन्हा एकदा हे दोन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची शक्यता आहे. तसं समीकरण जुळून आलं आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण अफ्रिका सामना पाहण्याची संधी क्रीडारसिकांना मिळू शकते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चुरस आहे. दुसरीकडे न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश आणि वेस्ट इंडिज हे संघ स्पर्धेतून बाद झाले आहेत. त्यामुळे भारत आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने येऊ शकतात. यासाठी फक्त एक समीकरण जुळलं की झालं. भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन सामने शिल्लक आहेत. दक्षिण अफ्रिकेचे दोन आणि ऑस्ट्रेलियाचे चार सामने उरले आहेत.

…तर भारत आणि दक्षिण अफ्रिका अंतिम सामना

भारताचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी सामने शिल्लक आहेत. भारताने या दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर अंतिम फेरीत स्थान पक्कं होईल. पण एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभव झाला तर श्रीलंका ऑस्ट्रेलिया मालिकेवर अवलंबून राहावं लागेल. श्रीलंकेने काहीही करून ऑस्ट्रेलियाला एका सामन्यात पराभूत करावं लागेल. जर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही सामन्यात पराभव झाला तर भारताचं अंतिम फेरीचं स्वप्न भंगेल.

दक्षिण अफ्रिकेचं अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित आहे. दक्षिण अफ्रिकेला पाकिस्तानविरुद्ध दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवायचा आहे. पण दोन्ही सामन्यात पराभव झाला तर ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागेल. जर भारताने उर्वरित दोन्ही सामने जिंकले आणि दक्षिण अफ्रिकेने एक सामना जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका सामना पाहायला मिळेल.

दक्षिण अफ्रिकेचा संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रेट्झके, टोनी डी झोर्झी, मार्को जॅनसेन, केशव महाराज, क्वेना माफाका, एडन मार्कराम, विआन मुल्डर, सेनुरन मुथुसामी, डेन पॅटरसन, कागिसो रबाडा, रियान रिकेलब्स, ट्रायस्टन रिकेलब्स आणि काइल वेरेन.

दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान सामन्याचं वेळापत्रक

  • 26-30 डिसेंबर, पहिली कसोटी, सेंच्युरियन
  • 03-07 जानेवारी, दुसरी कसोटी, केपटाऊन
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.