IND vs SL 2nd ODI : दुसऱ्या वन डे सामन्यात श्रीलंकेकडून टीम इंडियाला 241धावांचं आव्हान, वॉशिंग्टनचा ‘सुंदर’ मारा
टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये प्रेमदासा स्टेडियमवर दुसरा वन डे सामन्यात श्रीलंका संघाने 50 ओव्हरमध्ये 240-9 धावा केल्या आहेत. तर टीम इंडियाला जिंकण्यासाठी 241 धावांचं आव्हान आहे. श्रीलंका पुन्हा एकदा आपलं टार्गेट वाचवण्यात यशस्वी ठरते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये प्रेमदासा स्टेडियमवर दुसरा वन डे सामना सुरू आहे. श्रीलंकेने दुसऱ्याही सामन्यामध्ये टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका संघाने 50 ओव्हरमध्ये 240-9 धावा केल्या आहेत. अविष्का फर्नांडो याने सर्वाधिक 40 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये दुनिथ वेललागे याने 39 धावा आणि कामिंदू मेंडिस यांनीही 40 धावा करत श्रीलंकेला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारत आली. टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाला जिंकण्यासाठी 241 धावांचं आव्हान आहे.
प्रेमदासा स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्यी टी-20 सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेची पहिल्याच बॉलवर विकेट घेत बॅकफूटला ढकललं होतं. पहिल्या सामन्याच जिगरबाज खेळी करणाऱ्या निसांकाला सिराजने शून्यावर माघारी पाठवलं. त्यानंतर मेंडिंस आणि फर्नांडो यांनी डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली होती. दोघांनीही 74 धावांची दमदार भागीदारी केली होती. मात्र त्यावेळी रोहितने वॉशिंग्टन सुंदरकडे चेंडू दिला.
वॉशिंग्टन याने खतरकनाक होत चाललेल्या फर्नांडोला आपल्याच गोलंदाजीवर 40 धावांवर कॅच आऊट करत ही जोडी फोडली. त्यापाठोपाठ मेडिंसलही 30 धावांवर आऊट करत सुंदरने श्रीलंकेला दुसरा झटका दिला. मैदानावर आलेल्या समरविक्रमा याने वेळ घेतला पण त्याला अक्षर पटेलने आपली शिकार बनवलं.
श्रीलंका बॅकफूटला गेली होती, मात्र पुन्हा एकदा दुनिथ वेललागे याने दमदार 39 धावांची खेळी करत डाव सावरला. कामिंदू मेंडिसनेही शेवटला महत्तपूर्ण 40 धावा करत संघाला 240 धावापर्यंत पोहोचवलं. टीम इंडियाला दुसरा सामना जिंकण्यासाठी 241 धावा कराव्या लागणार आहेत. मात्र श्रीलंका पुन्हा एकदा आपलं टार्गेट वाचवण्यात यशस्वी ठरते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11 श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग