IND vs SL 2nd ODI : दुसऱ्या वन डेमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव, श्रीलंकेचा 32 धावांनी विजय

IND vs SL : श्रीलंका आणि टीम इंडियामध्ये झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यामध्ये 32 धावांनी पराभव झाला आहे. या विजयासह श्रीलंकने तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे.

IND vs SL 2nd ODI : दुसऱ्या वन डेमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव, श्रीलंकेचा 32 धावांनी विजय
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 04, 2024 | 10:23 PM

दुसऱ्या वन डे सामन्यात श्रीलंका संघाने टीम इंडियाचा पराभव केला आहे. श्रीलंकेने दिलेल्या 241 धावांचा पाठालाग करतना टीम इंडिया 208 धावांवर ऑल आऊट झाली. श्रीलंका संघाचा जेनिथ लियानागे 6 विकेट घेत टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरूंग लावला. कॅप्टन रोहित शर्माची 64 धावांची अर्धशतकी खेळी दुसऱ्या वन डे सामन्यातही व्यर्थ गेली. या विजयासह श्रीलंकने तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. श्रीलंका संघाने टीम इंडियाला 1108 दिवसांपूर्वी म्हणजेच 23 जुलै 2021 हरवलं होतं. त्यानंतर आता 4 ऑगस्ट 2024 मध्ये टीम इंडियाश्रीलंकेविरुद्धचा सामना हरला आहे.

श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने दमदार सुरूवात केली होती. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी 97 धावांची सलामी दिली होती. तरीही टीम इंडियाला 240 धावा करता आल्या नाहीत. रोहित शर्मा मैदानावर असताना सामना एकतर्फी वाटत होता मात्र तो आऊट झाल्यावर परत एकदा बाकी सर्वच फलंदाजांनी श्रीलंकेच्या बॉलर्ससमोर नांगी टाकल्याचं दिसून आलं.

रोहित शर्मा 64  धावा, शुबमन गिल 35 धावा, विराट कोहली 14 धावा, श्रेयस अय्यर 07 धावा, केएल राहुल 0 धावा, शिवम दुबे 0 धावा, वॉशिंग्टन सुंदर 15  धावा, अक्षर पटेलने 44 धावा केल्या.  श्रीलंकेच्या  जेनिथ लियानागेच्या फिरकीसमोर सर्वच भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्कारल्याचं दिसून आलं. पठ्ठ्याने टीम इंडियाच्या सहा विकेट घेतल्या तर बाकी तीन विकेट श्रीलंकेचा कॅप्टन चरिथ असालंका याने घेत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.