दुसऱ्या वन डे सामन्यात श्रीलंका संघाने टीम इंडियाचा पराभव केला आहे. श्रीलंकेने दिलेल्या 241 धावांचा पाठालाग करतना टीम इंडिया 208 धावांवर ऑल आऊट झाली. श्रीलंका संघाचा जेनिथ लियानागे 6 विकेट घेत टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरूंग लावला. कॅप्टन रोहित शर्माची 64 धावांची अर्धशतकी खेळी दुसऱ्या वन डे सामन्यातही व्यर्थ गेली. या विजयासह श्रीलंकने तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. श्रीलंका संघाने टीम इंडियाला 1108 दिवसांपूर्वी म्हणजेच 23 जुलै 2021 हरवलं होतं. त्यानंतर आता 4 ऑगस्ट 2024 मध्ये टीम इंडियाश्रीलंकेविरुद्धचा सामना हरला आहे.
श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने दमदार सुरूवात केली होती. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी 97 धावांची सलामी दिली होती. तरीही टीम इंडियाला 240 धावा करता आल्या नाहीत. रोहित शर्मा मैदानावर असताना सामना एकतर्फी वाटत होता मात्र तो आऊट झाल्यावर परत एकदा बाकी सर्वच फलंदाजांनी श्रीलंकेच्या बॉलर्ससमोर नांगी टाकल्याचं दिसून आलं.
रोहित शर्मा 64 धावा, शुबमन गिल 35 धावा, विराट कोहली 14 धावा, श्रेयस अय्यर 07 धावा, केएल राहुल 0 धावा, शिवम दुबे 0 धावा, वॉशिंग्टन सुंदर 15 धावा, अक्षर पटेलने 44 धावा केल्या. श्रीलंकेच्या जेनिथ लियानागेच्या फिरकीसमोर सर्वच भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्कारल्याचं दिसून आलं. पठ्ठ्याने टीम इंडियाच्या सहा विकेट घेतल्या तर बाकी तीन विकेट श्रीलंकेचा कॅप्टन चरिथ असालंका याने घेत विजयावर शिक्कामोर्तब केलं.
Sri Lanka win the 2nd ODI by 32 runs.#TeamIndia will look to bounce back in the 3rd and Final #SLvIND ODI.
Scorecard ▶️ https://t.co/KTwPVvU9s9 pic.twitter.com/wx1GiTimXp
— BCCI (@BCCI) August 4, 2024
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग