बंगळुरु: भारत आणि श्रीलंकेमध्ये मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला (India vs Srilanka test) उद्यापासून बंगळुरुमध्ये सुरुवात होत आहे. हा डे-नाईट कसोटी सामना आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) आणि हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) हे एखाद्या खेळाडूला जास्तीत जास्त संधी देण्यावर तसंच विजयी संघ कायम ठेवण्यावर भर देतात. पण उद्यापासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी ते कशी संघ निवड करतात? याची उत्सुक्ता आहे. कारण अक्षर पटेल आता संघात परतला आहे. सध्याच्या कसोटी संघात हरयाणाचा ऑफ स्पिनर जयंत यादव कमकुवत दुवा आहे. पण त्याने टीम इंडियाला फार फरक पडत नाही. कारण टीम इंडियाने मोहाली कसोटी एक डाव आणि तब्बल 222 धावांनी जिंकली होती. जयंतने या सामन्यात 17 षटके गोलंदाजी केली. पण त्याला विकेट मिळाली नाही. तेच जाडेजा आणि अश्विनने दोन्ही डावात मिळून 20 पैकी 15 विकेट घेतल्या.
कसोटी गमावण भारताला नाही परवडणार
डे-नाईट कसोटी सामन्यात गुलाबी रंगाचा पिंक एसजी टेस्ट बॉल वापरण्यात येईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे पुढच्या नऊ पैकी एकही कसोटी सामना गमावणं भारतला परवडणार नाहीय. वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी बनवण्याची शक्यता कमी आहे. कुठलीही टीम विजयी संघात बदल करत नाही. पण अक्षर पटेलच्या समावेशामुळे संघाची ताकत वाढू शकते. अहमदाबादमध्ये इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या डे-नाईट कसोटी सामन्यात त्याने 70 धावा देऊन 11 विकेट घेतल्या होत्या.
तर जयंत यादववर तो अन्याय ठरेल
श्रीलंकेच्या कसोटी संघात पहिल्या सहा फलंदाजांपैकी चार डावखुरे फलंदाज आहेत. त्यामुळे राहुल द्रविड दोन डावखुरे फिरकी गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेईल का? या प्रश्नाचं उत्तर उद्याच मिळेल. दुसऱ्याबाजूला जयंत यादवला पहिल्या कसोटीत विकेट मिळाली नसेल. पण एका सामन्यातील खराब कामगिरी खेळाडूला बाहेर बसवलं, तर त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो. एकप्रकारे त्याच्यासोबतही तो अन्याय ठरेल.
मोहम्मद सिराजला संधी मिळेल?
मोहम्मद सिराजही चांगली गोलंदाजी करतोय. एखादा चांगला स्पेलही प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवू शकतो. मोहम्मद सिराजने न्यूझीलंड विरुद्ध मुंबई कसोटीत हे दाखवून दिलं होतं. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरमध्ये स्पर्धा असली, तरी बॅटिग ऑर्डरमध्ये काही बदल होण्याची शक्यता खूपच कमी आहे.
संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, आर.अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह