Ind vs SL World Cup Highlights : टीम इंडियाकडून श्रीलंकावर 302 धावांनी विजय, सेमी फायनलमध्ये धडक
Ind vs SL World Cup 2023 Highlights in Marathi : टीम इंडियाने श्रीलंकेचं लंकादहन केलं आहे. टीम इंडियाच्या विजयात शुबमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यानंतर मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज या दोघांनी निर्णायक भूमिका बजावली.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाने श्रीलंकेवर 302 धावांनी मात केली आहे. टीम इंडियाचा हा वर्ल्ड कपमधील सलग सातवा विजय ठरला आहे. टीम इंडियाकडून श्रीलंकेला विजयासाठी 358 धावांचे आव्हान देण्यात आले होते. मात्र श्रीलंकला ऑलआऊट 55 रन्सचं करता आल्या. टीम इंडिया या विजयासह आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 च्या सेमी फायनलमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली आहे. तसेच टीम इंडियाने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये अव्व्ल स्थानी झेप घेतली आहे. टीम इंडियाचा आता पुढील सामना हा दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
IND vs SL match live score | टीम इंडियाचा सलग सातवा विजय
मुंबई | टीम इंडियाने श्रीलंकावर 302 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील हा सलग सातवा विजय ठरलाय. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 358 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र श्रीलंकाने टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर 55 धावांवरच गुडघे टेकले. टीम इंडियाने या विजयासह सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.
-
IND vs SL match live score | कसुन राजिथा आऊट, श्रीलंकेला नववा धक्का
मुंबई | मोहम्मद शमी याने कसुन राजिथा याला आऊट करत श्रीलंकेला नववा झटका दिलाय. शमीने यासोबत आपल्या 5 विकेट्स पूर्ण केल्या आहेत.
-
-
IND vs SL match live score | श्रीलंकेला आठवा झटका, टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर
मुंबई | टीम इंडियाने श्रीलंकेला आठवा झटका दिला आहे. मोहम्मद शमी याने एंजलो मॅथ्युज याला 12 धावांवर क्लिन बोल्ड केलंय. टीम इंडिया यासह विजयाच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.
-
IND vs SL match live score | दुषन हेमंथा आऊट, श्रीलंकेला सहावा धक्का
मुंबई | मोहम्मद शमीने श्रीलंकेला 2 बॉलमध्ये 2 झटके दिले आहेत. त्यामुळे श्रीलंकेची 6 बाद 14 अशी स्थिती झाली आहे.
-
IND vs SL match live score | चरिथ असलंका आऊट, श्रीलंकेला पाचवा धक्का
मुंबई | श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. श्रीलंकाने पाचवी विकेट गमावली आहे. चरिथ असलंका आऊट 1 धाव करुन आऊट झाला आहे.
-
-
IND vs SL match live score | कॅप्टन कुसल मेंडीस आऊट, श्रीलंका अडचणीत
मुंबई | टीम इंडियाने श्रीलंकेला चौथा झटका दिलाय. मोहम्मद सिराजने याने कॅप्टन कुसल मेंडीस याला क्लिन बोल्ड केलंय. त्यामुळे श्रीलंकाची स्थिती 3 बाद 4 अशी झालीय.
-
IND vs SL match live score | मोहम्मद सिराजकडून श्रीलंकेला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके
मुंबई | मोहम्मद सिराज याने श्रीलंकेला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके दिले आहेत. त्यामुळे श्रीलंकेची 3 बाद 2 अशी स्थिती झाली आहे. सिराजने दिमुथ करुणारत्नेनंतर सदीरा समरविक्रमा याला आऊट केलं.
-
India Vs Sri Lanka Cricket Match live score : श्रीलंकेला दुसरा धक्का
श्रीलंकेला दुसरा धक्का बसला आहे. दिमुथ करुणारत्ने शून्यावर बाद झाला आहे.
-
India Vs Sri Lanka Cricket Match live score : जसप्रीत बुमराहला पहिलं यश, निसंकाला पाठवलं तंबूत
जसप्रीत बुमराह याला पहिल्याच चेंडूवर यश मिळालं. पथुम निसंकाला पायचीत केलं. त्यामुळे श्रीलंकेवर दबाव वाढला आहे.
-
India Vs Sri Lanka Cricket Match live score : भारताचं श्रीलंकेसमोर विजयासाठी 358 धावांचं आव्हान
भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 357 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने आठ गडी गमवून 358 धावा केल्या. आता श्रीलंका हे आव्हान गाठणार का? याकडे लक्ष लागून आहे.
-
India Vs Sri Lanka Cricket Match live score : टीम इंडियाला सहावा धक्का
टीम इंडियाला श्रेयस अय्यरच्या रुपाने सहावा धक्का बसला आहे. 82 धावा करून श्रेयस अय्यर तंबूत परतला आहे. टीम इंडियाच्या 6 गडी बाद 333 धावा झाल्या आहेत.
-
India Vs Sri Lanka Cricket Match live score : भारताला पाचवा धक्का
भारताला पाचवा धक्का बसला असून सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे. चमीराने त्याला अवघ्या १२ धावांवर माघारी पाठवलं.
-
Ind Vs SL World Cup 2023 live score : किंग कोहली 88 धावांवर आऊट
भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली ८८ धावांवर आऊट झाला आहे. सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक शतकांची बरोबरी करण्यापासून तो अवघ्य १२ धावांनी कमी पडला.
-
India Vs Sri Lanka live score : शुबमनचं गिलं आऊट, शतक हुकलं
भारताला दुसरा झटका बसला असून ओपनर शुबमन गिल 92 धावांवर आऊट झाला आहे. दिलशान मदुशंका यानेच भारताला दुसरा धक्का दिला आहे. श्रेयस अय्यर मैदानात उतरला आहे.
-
Ind Vs SL World Cup 2023 live score : विराट पाठोपाठ गिलंच अर्धशतक
शुभमन गिलचे अर्धशतकही पूर्ण झाले आहे. शुभमन गिलने 55 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. गिलच्या खेळीत 8 चौकारांचा समावेश होता. विराट ५३ धावा करून दुसऱ्या टोकाला खेळत आहे. 19 षटकांनंतर भारताची धावसंख्या 119-1 आहे.
-
India Vs Sri Lanka Cricket Match live score : विराट कोहलीचं अर्धशतक
कोहलीने 17व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. कोहलीचे या विश्वचषकातील हे चौथे अर्धशतक आहे. तर वन डे मधील 117 व्या अर्धशतकाला त्याने गवसणी घातली आहे.
-
India Vs Sri Lanka ICC Match live score : रोहित शर्मा बोल्ड
पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर रोहित शर्मा याला बोल्ड केलं, श्रीलंकेच्या दिलशान मदुशंका याने त्याला चकवलं आणि अवघ्या चार धावांवर रोहितला माघारी पाठवलं.
-
Ind Vs SL World Cup live score : भारत आणि श्रीलंका दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (W/C), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका
-
India Vs Sri Lanka live score : श्रीलंकेचा टॉस जिंकत प्रथम फिल्डिंगचा निर्णय
श्रीलंका संघाचा कर्णधार कुसल मेंडिसने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ दुसऱ्यांदा वर्ल्ड कपमध्ये प्रथम बॅटींग करणार आहे.
-
Reservation : मुस्लिम समाजाला शिक्षणात 5 टक्के आरक्षण देण्याची मागणी
मुस्लिम समाजाला शिक्षणात 5 टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी वारीस पठाण यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकारकडे एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी ही मागणी केली आहे.
-
India Vs Sri Lanka ICC Match live score : रोहित होम ग्राऊँडवर फिरवणार दांडपट्टा
आयपीएलमध्ये मुंबईचं होम ग्राऊंड असल्यामुळे रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्य कुमार यादव यांना मोठा फायदा होऊ शकतो.
-
Maratha Reservation : पंढरपूरच्या कासेगावात मराठा संघटनांची ट्रॅक्टर रॅली
पंढरपूरच्या कासेगावात मराठा संघटनांची ट्रॅक्टर रॅली काढली आहे. जरांगेंच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी ही ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे. पंढरपूर सोलापूर रस्त्यावर कासेगावमध्ये मराठा संघटनांनी ही रॅली काढली आहे.
-
Ind Vs SL World Cup 2023 live score : आज सेमी फायनलचं तिकिट होणार पक्क
भारतीय संघाने आज श्रीलंकेचा पराभव केला तर त्याचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होईल. कारण पहिल्या 6 सामन्यात 6 विजयांसह त्यांचे 12 गुण आहेत आणि आता जर त्यांनी 7 वा सामना जिंकला तर 14 गुणांसह ते उपांत्य फेरीतील प्रवेशाचे पूर्ण दावेदार बनतील.
-
Ind Vs SL Match live score : भारत श्रीलंका Head to Head
वर्ल्ड कपमध्ये भारत आणि श्रीलंकेमध्ये नऊ सामने झाले आहेत. यामधील चार सामने सामने श्रीलंका तर चार सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. एक सामना अनिर्णित राहिला असून आज जो संघ विजयी होईल तो आकेडेवारीमध्ये सरशी साधेल.
Published On - Nov 02,2023 1:05 PM